Happy Chaitra Navratri Marathi Wishes: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा मराठीWhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरी करा वासंतिक नवरात्र

शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची रीत आहे.

Chaitra Navratri Wishes | File Photo

महाराष्ट्रात शारदीय नवरात्री इतकीच धूम वासंतिक नवरात्र (Vasantik Navratri) किंवा चैत्र नवरात्रीमध्ये (Chaitra Navratri) असते. चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांत ती साजरी केली जाते. यंदा चैत्र नवरात्र 13 एप्रिल पासून सुरू होणार असून 21 एप्रिल पर्यंत रंगणार आहे. या नऊ रात्री नऊ दिवसांच्या काळात दुर्गेच्या नऊ रूपांचं पूजन करून सण साजरा करण्याची पद्धत आहे. चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस हा गुढी पाडवा (Gudi Padwa) असल्याने हिंदू धर्मिय या दिवशी नव्या वर्षाची सुरूवात आनंदमय वातावरणामध्ये व्हावी म्हणून प्रार्थना करतात. पण यंदा सार्‍याच सणांवर कोरोनाचं सावट असल्याने हा सण सलग दुसर्‍या वर्षी साधेपणाने आणि अनावश्यक गर्दी टाळून करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. म्हणूनच यंदा कोरोना संकटासोबतच इतर इष्टापत्ती देखील दूर व्हावीत म्हणून शुभकामना करत तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रिटींग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, Wishes, HD Images, GIFs यांच्या माध्यमातून देऊन साजरा करण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून करण्यात आलेली ही इमेजेस (Images) WhatsApp Status, Facebook Messages द्वारा करून दिवसाची आनंदाने सुरूवात करण्यास विसरू नका.

चैत्र नवरात्रीदरम्यान महिला हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. आंबेडाळ, पन्हे यांचा बेत करतात. मात्र यंदा या सार्‍याच सामुहिक गाठीभेटींच्या कार्यक्रमांवर, सेलिब्रेशन वर बंधन आहे. मग कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहून हा सण साजरा करा. नक्की वाचा: Chaitra Navratri 2021 Dates and Muhurat: चैत्र नवरात्र यंदा 13 एप्रिल पासून; जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त.

चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

Chaitra Navratri Wishes | File Photo

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते

चैत्र नवरात्र च्या मंगलमय शुभेच्छा

Chaitra Navratri Wishes | File Photo

चैत्र नवरात्रीच्या मंगल पर्वावर

तुमच्या आयुष्यात सुख, शांती,समृद्धी,आनंद  येवो

हीच आमची शुभकामना!

Chaitra Navratri Wishes | File Photo
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Chaitra Navratri Wishes | File Photo
चैत्रगौर पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Chaitra Navratri Wishes | File Photo

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः

शुभ चैत्र नवरात्री

Chaitra Navratri Wishes | File Photo

शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची रीत आहे. यावेळेस नऊ विविध धान्यांची बीयाणं रूजवली जातात आणि दशमीच्या दिवशी विसर्जन करतात. महाराष्ट्रात या काळात चैत्रगौर देखील साजरा केला जातो. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीय या महिन्याभराच्या काळासाठी साजरा केला जातो.