Buddha Purnima 2019 Images: बुद्ध पौर्णिमा निमित्त HD Images, Wallpapers शेअर करुन द्या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा!
बुद्ध पौर्णिमेचे शुभेच्छा संदेश देऊन यंदा साजरी करा बुद्ध जयंती
Buddha Purnima HD Wallpapers & Images: वैशाख महिन्यातील पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा 18 मे दिवशी 2019 बुद्ध पौर्णिमा भारतासह आशिया खंडात आणि जगभर साजरी केली जाणार आहे. भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. म्हणूनच ह्या दिनानिमित्त आपल्यापासून दूर असलेल्या देश-विदेशातील व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही शुभेच्छा संदेश देणार आहोत, जेणे करुन तुम्ही आजच्या दिनाचे महत्त्व लक्षात घेता, त्वरित तुमच्या आप्त जनांना हे संदेश पाठवू शकता. Buddha Purnima 2019 Wishes & Messages: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Greetings, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं!
बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.