Happy Bhaubeej 2025 Wishes In Marathi: भाऊबीजेच्या शुभेच्छा Quotes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा भावंडांचा दिवस

भाऊबीज दिवशी बहीण भावाचं औक्षणं करते. या औक्षणाच्या बदल्यात भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा हा बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण साजरा करत दिवाळी सणाची सांगता केली जाते.

Happy Bhaubeej 2025 Wishes In Marathi

Happy Bhaubeej 2025 Wishes In Marathi: दिवाळीच्या दिवसातील शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीज २२ ऑक्टोबर दिवशी साजरा केला जात आहे. भाऊबीज दिवशी बहीण भावाचं औक्षणं करते. या औक्षणाच्या बदल्यात भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा हा बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण साजरा करत दिवाळी सणाची सांगता केली जाते. मग तुमच्या बहीण-भावाला या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, HD Images, Wishes, Quotes, WhatsApp Status पाठवून हा सण सेलिब्रेट करू शकता.

बहीण-भावाचं नातं हे अनेकदा तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं असतं. पण किमान सणाच्या दिवशी या गोड पण तितक्याच नटखट नात्याला अजून थोडं स्पेशल करण्यासाठी थोडे प्रयत्न करा. एकमेकांच्या गरजा, पसंती, नापसंती ओळखून त्यांना भेटवस्तू देऊन खूष करा.

दारी दिव्यांची आरास,

अंगणी रांगोळीचा सडा फुलला हर्षाने भरले मन,

भाऊराया लक्ष दिव्यांनी करते औक्षण

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

जिव्हाळ्‌याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे भावा-बहिणीची साथ,

आयुष्यभर अतूट राहु दे

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

सण प्रेमाचा,

सण मायेचा,

सण भावा-बहीणीच्या पवित्र नात्याचा

भाऊबीजेच्या शुभेच्छा!

दिवाळीचे हे दिवे लखलखते,

उजळून टाकू दे बंध प्रेमाचे

चिरंतर राहो आपले बहीण-भावाचे नाते

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीजेचा सण हा यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जाते. भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यम राजाची पूजा करतात. त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित रहावा अशी त्यामागील कामना आहे. अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळून पूजा देखील करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement