Haldi Kunku 2021 Ukhane in Marathi: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये घ्या 'हे' हटके मराठी उखाणे

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अजुन एक गोष्ट हमखास केली जाते ती म्हणजे महिलांना उखाणे घेण्यास सांगणे.उखण्यांचा हा खेळ लग्न झालेल्या महिलांमध्ये हमखास खेळला जातो.'नाव घेणं' म्हणजे काही विशिष्ट यमक पंक्तींमध्ये नवर्‍याचं नाव हुशारीने घेतलं जातं.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ख़ास मकर संक्रांत आणि हळदी कुंकवाच्या समारंभात घेता येतील असे उखाणे.

Photo Credits: Instagram

Haldi Kunku 2021 Ukhane in Marathi:  नवीन वर्षाचा पहिला वहीला सण म्हणजे अर्थात मकर संक्रात. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.महाराष्ट्रीयन लोकांसाठी, मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण आहे आणि हा उत्सव देशभर भव्य नावाने साजरा केला जातो. महिला वर्गामध्ये मकर संक्रांतीच्या सणामध्ये विशेष आकर्षण ते म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे! या दिवसांमध्ये पिकं बहरलेली असतात. रब्बी हंगामातील पिक हातात आलेलं असतं. त्यामुळे साधारणपणे या दिवसात चैतन्याचं वातावरण असतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांतीचा सण हा फार महत्त्वाचा असतो. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. ( Makar Sankranti Rangoli Design: मकर संक्रांतीला दारापुढे काढा 'या' सुंदर सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन)

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अजुन एक गोष्ट हमखास केली जाते ती म्हणजे महिलांना उखाणे घेण्यास सांगणे.उखण्यांचा हा खेळ लग्न झालेल्या महिलांमध्ये हमखास खेळला जातो.'नाव घेणं' म्हणजे काही विशिष्ट यमक पंक्तींमध्ये नवर्‍याचं नाव हुशारीने घेतलं जातं.आता मकर संक्रांत, हळदी कुंकवाच्या आयत्या वेळी नाव सुचन कठीणच आहे.मात्र तुम्ही चिंता करू नका कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ख़ास मकर संक्रांत आणि हळदी कुंकवाच्या समारंभात घेता येतील असे उखाणे.चला तर मग पाहूयात खास मराठमोळे उखाणे.

कान भरण्यात बायका आहेत हौशी,

..........  चे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

 

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,

.......... चे नाव घेते, सार्‍या जणी बसा

 

हळदी कुंक आहे सौभाग्याची शान,

..........   रावांच नाव घेते ठेवून सर्वांचा मान

 

भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता

.......... चे नाव घेते खास तुमच्या करिता

 

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,

......... रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस

 

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात

.......... चे नाव घेते माझ्या मनात

 

हळदी कुंक साठी जमल्या सर्व बायका

.......... नाव घेते सर्वांनी ऐका

पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपला मुलगा शनि याच्या घरी जातो.मकर संक्रांतीपासून ऋतु बदलही सुरू होतो.धर्मग्रंथानुसार या काळात आंघोळ केल्यास आणि दान केल्यास चांगले परिणाम होतात. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्यास त्या व्यक्तीला इच्छित आशीर्वाद मिळतो.