Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: हळदी कुंकू समारंभासाठी मैत्रिणींनी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून पाठवा खास 'निमंत्रण पत्रिका'
तुम्ही तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर खालील आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून तुम्ही WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण पाठवू शकता.
Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: यंदा मकर संक्रातीचा (Makar sankranti) सण सोमवारी म्हणजे १५ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. विवाहित महिला मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. या दिवशी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून त्या एकमेकींना वाण देतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू (Haldi Kunku) कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
तुम्ही देखील यंदा मकर संक्रांती निमित्त तुमच्या घरी खास हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर खालील आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून तुम्ही WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण पाठवू शकता. (हेही वाचा - Makar Sankranti 2024 Ukhane: मकर संक्रांती आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खास मराठी उखाण्यांची यादी)
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
तारीख:
वेळ:
पत्ता:
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
पत्ता -
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता:
लेडीज अँड लेडीज
एकदा किटी पार्टी पेक्षा
हळदी कुंकू समारंभात भेटू
कुठे?:
कधी?:
काय मग येताय ना?
चला सयांनो संस्कृती जपू..
रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी
आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
तारीख:
वेळ:
पत्ता:
मकर संक्रांतीत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असतं. महिला एकमेकींना वाण आणि हळदी-कुंकू लावून हा सण साजरा करतात. याशिवाय या दिवशी महिला खास उखाणे घेतात. महिलांसाठी मकर संक्रातीचा सण एक प्रकारची परवणीच असतो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2024 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

