Guru Purnima Wishes in Marathi: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी संदेश, Quotes, Images शेअर करत साजरी करा व्यास पौर्णिमा
गुरु-शिष्य परंपरेमुळेच भारतातील अथांग आणि समृद्ध ज्ञान हजारो वर्षे सुरक्षित राहिले आहे.भारतीय तत्त्वज्ञानानुसार, मोक्ष किंवा आत्मज्ञान मिळवण्यासाठी समर्थ गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक मानले जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. याच नात्याचा गोडवा जपण्यासाठी आणि शिष्यांना आपल्या गुरूप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे गुरूपौर्णिमा (Guru Purnima) . यंदा गुरू पौर्णिमा 29 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. गुरू पौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा (Vyasa Purnima) म्हणून ओळखला जाणारा हा दिवस आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. मग तुमच्या आयुष्यात दीपस्तंभाप्रमाणे उभ्या असणार्या या गुरूंना आज गुरूपौर्णिमेच्या दिवशी धन्यवाद म्हणत शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, Wishes, Messages, Quotes शेअर करत तुमच्या गुरू-शिष्यांच्या नात्यामधील गोडवा वृद्धिंगत करायला विसरू नका.
महाभारताचे रचना करणारे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस देखील आषाढ पौर्णिमेचा आहे. त्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा करत गुरूंच्या बाबत आदरभाव व्यक्त केला जातो. या निमित्ताने गुरूंना आदरांजली व्यक्त केली जाते. त्यांना भेटवस्तू दिली जाते. गुरु म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. जलाशयात पाणी खूप आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हा भाव यानिमित्ताने रूजवण्याचा प्रयत्न असतो. नक्की वाचा: Guru Purnima 2026 Date: यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या तिथी, महत्त्व.
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु-शिष्य परंपरेमुळेच भारतातील अथांग आणि समृद्ध ज्ञान हजारो वर्षे सुरक्षित राहिले आहे.भारतीय तत्त्वज्ञानानुसार, मोक्ष किंवा आत्मज्ञान मिळवण्यासाठी समर्थ गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक मानले जाते. म्हणूनच गुरू-शिष्य हे नातं देखील पवित्र मानलं जाते आणि गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.