Guru Purnima 2026 Messages in Marathi: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी WhatsApp Greetings, Facebook Wishes, Quotes शेअर करत साजरी करा व्यासपौर्णिमा
गुरूपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आणि शिष्य आपल्या गुरूंच्या बाबत आदर व्यक्त करतात. भारतीय परंपरेत गुरूला ईश्वरापेक्षाही उच्च स्थान दिले गेले असून, अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक म्हणून गुरूकडे पाहिले जाते.
गुरु पौर्णिमा (Guru Purnima) हा सण केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, गुरू-शिष्य नात्यातील आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो.यंदा 29 जुलै दिवशी हा सण देशभरात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाईल. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा (Vyas Purnima) म्हणून साजरा केला जातो. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. मग तुमच्या आयुष्यातील गुरूस्थानी असलेल्या व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र,Greetings, Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवसही याच दिवशी असल्याने या पर्वाला व्यास पौर्णिमा असे नाव पडले आहे. वेदव्यास यांनी वेदांचे संकलन आणि महाभारताची रचना केल्याचे मानले जाते, म्हणूनच त्यांना आद्यगुरू म्हणून पूजण्याची भारतीय संस्कृतीमध्ये प्रथा आहे.
गुरूपौर्णिमेच्या मराठमोळ्या शुभेच्छा
त्यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातो.