Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)

Guru Nanak Jayanti 2020 Greetings: गुरु नानक देव हे शीख धर्मियांचे संस्थापक गुरु आहेत. धर्मांबाबत जागृती निर्माण करण्यासोबत शीख धर्माची शिकवण देणा-या गुरु नानक यांची आज 551 वी जयंती. देशभर गुरू नानक (Guru Nanak Jayanti) यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. त्याला कारणही तितके खास आहे. गुरु नानकांनी सदैव हिंदू आणि मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. अशा या महान गुरूंच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या शीख बांधवांना WhatsApp Status, Wishes च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकतो.

यंदा कोरोना व्हायरसमुळे हा दिवस मोठ्या संख्येने साजरा करता येणार नाही. म्हणून घरात राहूनच आपल्या प्रियजनांनान गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास हिंदी आणि मराठीतून शुभेच्छा संदेश

Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)
Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Guru Nanak Jayanti 2019: आयुष्य कसे जगावे याचा मूलमंत्र देणारे गुरुनानकांचे '9' बहुमोल उपदेश

Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)
Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)
Guru Nanak Jayanti 2020 HD Images (Photo Credits: File)

गुरुपुरब निमित्त गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन करण्यात येते. गुरुद्वारा आणि नागरिकांच्या घरी लोक गुरुबाणीचा पाठ सुद्धा करतात. या दिवशी काही ठिकाणी मिरवणूक आणि शोभा यात्रा सुद्धा काढल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त संख्येने एकत्रित जमा न होता शीख बांधवांनी अतिशय साधेपणाने हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.