Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याची तारीख, महत्व आणि तिथी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात 'गुढी पाडवा' हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी साजरा होणारा हा सण राजा शालिवाहनचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्रात लोक रंगीबेरंगी गुढी त्यांच्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावतात, जाणून घ्या अधिक माहिती
Gudi Padwa 2024: महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा होणारा गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात 'गुढी पाडवा' हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी साजरा होणारा हा सण राजा शालिवाहनचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्रात लोक रंगीबेरंगी गुढी त्यांच्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावतात. त्याच्या वर पितळेची भांडी टांगून पूजा केली जाते. हे शुभ, समृद्धी आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. पुरणपोळीसारखे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात आणि हा सण उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा मंगळवारी, 9 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. या सणाचे महत्त्व आणि उत्सव इत्यादीबद्दल जाणून घेऊया.
गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढीपाडवा हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, हा सण महाराष्ट्र आणि काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये साजरा केला जात असला, तरी या सणाचा उत्साह भारतभर पाहायला मिळतो.
नवीन वर्षाचा उत्सव:
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होते. नवीन वर्ष 2081 (मंगळवार 09 एप्रिल 2024) चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होईल. म्हणून या दिवशी हिंदू नववर्ष साजरे केले जाते.
महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतीक : गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या भूमीतील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव इथल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे प्रतीक आहे.
ऐतिहासिक महत्त्व: या दिवशी श्रीरामाचा वनवास संपला आणि ते अयोध्येला परतल्यावर जल्लोष करण्यात आला होता
पारंपारिक विधी आणि उत्सव: गुढीपाडव्याला लोक आपली घरे सजवतात. गुढी उभारून पूजा करून सणाचा दिवस साजरा करतात.
गुढी पाडव्याची तारीख आणि वेळ
चैत्र प्रतिपदा प्रारंभ: रात्री 11.50 (08 एप्रिल, 2024)
चैत्र प्रतिपदा रात्री 08.30 वाजता संपेल (09 एप्रिल 2024)
उदय तिथीनुसार 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे.
गुढी पाडवा उत्सव
गुढीपाडव्याला सकाळी आंघोळ करून ध्यान करून घराची स्वच्छता केली जाते, मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढली जाते आणि आंब्याच्या पानांचे तोरणलावले जाते. नवीन कपडे घातले जाता आणि गुढी घरात उभारली जाते आणि पूजा केली जाते.
घर आंब्याची पाने, फुले आणि रंगीबेरंगी रांगोळीने सजवली जातात. यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते. या सगळ्यानंतर भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात, तिथे त्यांचे स्वागत पुरणपोळी आणि गोड भाताने केले जाते. अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो.