Gudi Padwa 2021 Rangoli Designs: गुढीपाडव्याच्या दिवशी किचनमधील साहित्य वापरून दारासमोर काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स 

रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.आता काही दिवसातच साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आणि हिंदू संस्कृतीमधील नवीन वर्ष म्हणजे अर्थात गुढीपाडण्याचा सण साजरा होणार आहे.येत्या 13 एप्रिल रोजी भारतात गुढी उभरली जाईल.

Photo Credit : Youtube

Gudi Padwa Easy Rangoli Design: रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते.आजही बऱ्याच ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात. हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.आता काही दिवसातच साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आणि हिंदू संस्कृतीमधील नवीन वर्ष म्हणजे अर्थात गुढीपाडण्याचा सण साजरा होणार आहे.येत्या 13 एप्रिल रोजी भारतात गुढी उभरली जाईल.सण म्हटले की दरापुढे रांगोळी काढणे आलेच.सणासुदीच्या दिवसात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. आज आपण पाहणार गुढीपाडव्याच्या दिवशी  कमी वेळात सोपी रांगोळी   कशी काढता येईल. (Gudi Padwa 2021 Date: यंदा गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त)

लाटण्याचा वापर करुन गुढी ची रांगोळी 

पळीच्या सहाय्याने गुढीची  रांगोळी  

टूथ ब्रशचा वापर करुन कढलेली गुढी 

कांगव्याच्या सहाय्याने काढलेले गुढी 

झारा आणि चमच्याचा वापर करुन काढलेले गुढी 

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्या दिवशी सोने किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. तसंच नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद, आशा, स्वप्न घेऊन येत असतं. या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा ध्यास गुढीपाडव्या निमित्त करुया.