Happy Gudi Padwa 2020 Images: गुढीपाडव्या निमित्त मराठमोठी खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरे करा मराठी नववर्ष!
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. तर आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा करण्यात येणार आहे.
Gudi Padwa 2020 Images: साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ असणाऱ्या गुढी पाडव्यापासून मराठी नव वर्षाचे स्वागत केले जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. तर आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी घरोघरी आनंदाचे वातावरण दिसून येण्यासोबत गोडाचे पदार्थ बनवले जातात. तसेच घरासमोर गुढी उभारुन त्याचे पुजन केले जाते. काही ठिकाणी शोभायात्रा सुद्धा गुढी पाडव्यानिमित्त काढली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मोठ्या जल्लोषात गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येणार नाही आहे.
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील हिंदू धर्मियांसाठी फार महत्वाचा सण मानला जातो. या दिवसापासून नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने साज करत त्याचा आनंद द्विगुणीत केला जातो. गुढी उभारण्यासाठी रेशमी साडीस, कडुलिंब, साखरेची माळ, फुलांचा हार, तांब्या अशा गोष्टी वापरुन ती घरासमोर उभारली जाते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा असल्याचे सांगितले जाते. तर यंदाच्या गुढीपाडव्या निमित्त मराठमोठी खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरे करा मराठी नववर्ष!(Gudi Padwa 2020: 'गुढी पाडवा' सणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या)
महाराष्ट्रात चैत्र पाडवा म्हणजे नववर्षाची सुरूवात गुढी पाडवा म्हणून ओळखली जाते तसाच आंध्रप्रदेशात हा सण 'उगादी' म्हणून साजरा केला जातो. यंदा या सणाचा गोडवा घरात बसूनच द्विगुणित करा. वाईटाचा नाश करून नव्या वर्षात प्रवेश करताना तुमच्या सार्या आशा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच आमची प्रार्थना... तुम्हांला नव वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!