Gudi Padwa 2019: सिमेंटच्या जंगलात जागा नाही, शहरांमध्ये गुढी पाडवा साजरा करा नव्या ढंगात
Celebrate Gudi Padwa New And Modern Ways With Traditional Touch: गुढी पाडवा (Gudi Padwa 2019) हा मराठी मनाचा आणि मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक. असे असले तरी आज अनियंत्रीत पद्धतीने सीमा तोडून शहरं ज्या पद्धतीने आपला पसारा अवाढव्यपणे वाढवतायत ते पाहता केवळ गुढी पाडवाच नव्हे तर, सर्वच सण उत्सवांवर विविध प्रकारे बंधणं येत आहेत. अशा वेळी बदलत्या काळासोबत सण उत्सव साजरे करणे अपरिहार्य आहे. गुढी पाडवा सणसुद्धा त्याला अपवाद नाही. आज शहरांमध्ये घरं इतकी अरुंद आणि दाटीवाटीची बनली आहेत की, गुढी उभारण्याईतकीही जागा शिल्लख नाही. अशा वेळी सिमेंटची जंगलं (Concrete Forest) ठरु पाहात असलेल्या शहरात गुढी पाडवा (Gudi Padwa) कसा साजरा करु शकाल. घ्या जाणून..
सण, उत्सव हा समाजसंस्कृतीचा भाग
कोणताही सण, उत्सव हा त्या त्या समाजसंस्कृतीचा भाग असतो. मग ते खेडं असो की शहर. ज्या ज्या ठिकाणी मानवी समूह समाज म्हणून राहतो तिथे संस्कृती ही येतेच. प्रत्येक समाजाची संस्कृती ही प्रवाही असते. जणू प्रवाहीपणा हा संस्कृतीचा मूळ स्वभाव. जो समाज किंवा जी संस्कृती ही प्रवाहीत न होता बदलत्या काळाला स्वीकारत नाही ती कालबाह्य होते. बदलत्या काळाला स्वीकारणे म्हणजे संस्कृती संपणे अथावा कालबाह्य होणे नव्हे. त्याउलट बदल स्वीकारणे म्हणजे संस्कृती अधिक प्रवाही ठेवणे आणि तिचा विस्तार करणे. प्रत्येक मानवी समूह तो राहात असलेली भौगोलिक आणि राजकीय रचना ही त्या त्या संस्कृतीच्या बदलाला कारणीभूत ठरते. उदाहरणच घ्यायचे तर, मुंबई, पुणे ते शहर व्यवस्थापणाचा गंधही न लागलेली कोणतीही शहरं घ्या. लोकांची गरज म्हणा किंवा बांधकाम व्यावसायीक आणि व्यवस्थेचा स्वार्थ म्हणा घरांच्या रचना, आकार कमालीचे बदलत आहेत.
घरांच्या रचना, बदलती जीवनशैली आणि सण, उत्सव
शहरांमध्ये सण उत्सव साजरे करताना त्या त्या ठिकाणांच्या स्वत:च्या म्हणून काही अडचणी असतात. उदा. जसे की घर जर मोठ्या इमारतीत (बिल्डींग, टॉवर्स) असेल तर गुढी उभारायची कोठे हा मोठाच प्रश्न निर्माण होतो. रीतीरिवाज, संस्कृती आणि परंपरां याचा विचार करता गुढी ही नेहमी अंगणात किंवा दारवाजाजवळच उभारली जाते. गुढी ही शक्यतो उंच असावी असा संकेत. आता हाच नियम लागू करायचा तर, मोठमोठ्या इमारतींमध्ये उंबरठा ओलांडला की थेट जिनाच सुरु होतो. दरवाजाचा विचार करायचा तर, सेप्टी डोअर असतो. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो गुढी नेमकी उभारायची तर कोठे? (हेही वाचा, Happy Gudi Padwa 2019: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी-इंग्रजी SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, Images, Greetings!)
चाळीतल्या घरांमध्येही गुढी उभारणे कठीण
दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये झोपड्या आणि चाळींची संख्याही सतत वाढती आणि मोठी आहे. त्यातही चाळ जर बैठी असेल तर ठिक. चाळ जर दुमजील असेल तर गुढी उभारणे आणखीच कठीण होते. कारण चाळीच खाली राहणाऱ्या कुटुंबाणे गुढी उभारायची तर ती थेट त्याच्या घराच्या वर राहणाऱ्या कुटुंबाच्या गच्चीतच (गॅलरी) जाण्याची शक्यता अधिक. त्यामुळे मग पाढव्याची गुढी उभारायची तर कोठे? हा प्रश्न निर्माण होतो. (हेही वाचा, गुढीवरील रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब आणि इतर गोष्टींमागील महत्त्व आणि अर्थ काय?)
नोकरदार वर्गावरही मर्यादा
अलीकडे शहरात बहुतांश कुटुंब ही छोटी असतात. इतकी की नवारा-बायको असे दोघेच राहतात. त्यातही ती दोघेही नोकरदार असतात. पाडव्याला सरकारी सुट्टी असली तरी ती फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच. खासगी क्षेत्रात सुट्टी असतेच असे नाही. असलीच तर ती बदली असते. म्हणजे सुट्टीच्या दिवशी काम करायचे. त्याच्या बदली नंतर सुट्टी घ्यायची. परंपरा, संस्कृती आणि संकेतांचा विचार करायचा तर, सुर्योदयानंतर गुढी उभारावी आणि सुर्यास्तापूर्वी गुढी उतरावी. आता शहरातली स्थिती असी की, (खास करुन मुंबई) लोक सुर्योदयापूर्वी कामावर निघतात आणि सुर्यास्तानंतर घरी परततात. तर, मग गुढी पाडव्याला गुढी उभारायची कशी आणि सण साजरा तरी कसा करायचा? हा सवाल उपस्थित होतो.
अशी उभारा गुढी, साजरा करा पाडवा
खिडकी किंवा गच्ची: शहरांमध्ये गुडी पाडवा साजरा करताना गुढी उभारायचीच तर कालानुरुप पारंपरिक पद्धतीतही बदल करायला हवेत. जसे की, तुम्ही जर मोठ्या इमारतीत (बिल्डींग, टॉवर) राहात असाल आणि तुमच्या हॉलला खिडकी किंवा गच्ची (गॅलरी) असेल तर या जागेचा छान वापर करता येऊ शकेल. गच्चीला असलेली ग्रील तुमच्या कामी येऊ शकतो. अर्थात खिडकी किंवा गच्चीची जागा पुरेशी हवेशीर आहे का हे पाहा. ती जागा जर अंधारी, कोंदट अशी असेल, त्या जागेत रद्दी, भंगार, जुनाट फर्निचर आदी गोष्टींनी ही जागा आगोदरच व्यापली असेल तर, तशा ठिकाणी मुळीच गुढी उभारू नका. अर्थात, साफसफाई करुन उभारली तर अधिकच उत्तम. (हेही वाचा, गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!)
लहान गुडी घरातच उभारण्याचा पर्याय: खरे तर गुढी ही नेहमी उंच उभारावी. परंतू, शहरात तशी सोय नाही हे आपण जाणलेच. अशा वेळी एक तडजोड म्हणून किंवा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे म्हणून हा पर्याय ठिक आहे. बाजारत मिळत असलेल्या छोटी गुढी विकत आणून किंवा एक प्रातिनिधीक स्वरुपात छोटी गुढी घरातच तयार करुन हॉल किंवा घरातील नेहमीच्या वापरातील टेबलवर (टीव्ही, अभ्यास वैगेरेंसाठी वापरावयाच्या) ठेवता येऊ शकते. या गुढीचीही मनोभावे प्रतिष्ठापणा, पूजा करता येऊ शकते. रेडीमेड किंवा छोटी पण टीकाऊ गुढी असेल तर त्याचा फायदा तुम्हाला सौंदर्याच्या दृष्टीनेही घेता येऊ शकतो. जसे की, गुढीपाडवा संपला की ती गुढी घरातील टेबलवर एक कलाकृती म्हणून ठेवता येऊ शकते. तुमच्याकडे जर कार असेल तर, तुम्ही कारमध्येही गुढी ठेऊ शकता.
देव्हारा तर आहेच: समजा वरील कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तर देव्हारा तर आहेच. शक्यतो देव, धर्म, रुढी, परंपरा मानणाऱ्या कोणत्याही कुटुंबात शक्यतो देव्हारा नाही असे अपवादानेच घडते. त्यामुळे अगदीच जागा नसेल तर, तुम्ही देव्हाऱ्यासमोरही तुम्ही गुढी उभारुन गुढी पाडवा साजरा करु शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)