Gopalkala 2026 Images: गोपाळकाल्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Photos द्वारा देत गोविंदांचा उत्साह वाढवा!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा गोपाळकाला हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्याची परंपरा जपत गोविंदा साजरा करणार्‍यांना द्या शुभेच्छा!

Gopalkala Wishes

Dahi Handi Wishes: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा गोपाळकाला (Gopalkala) हा सण महाराष्ट्रातील सर्वात उत्साही आणि सामूहिक सणांपैकी एक मानला जातो. मुंबई, पुणे, ठाणे यांसह राज्यभरातील गल्लीबोळांत या दिवशी 'गोविंदा आला रे आला' अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून जाते. मग गोविंदा पथकातील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबतच नातेवाईक, आप्तेष्टांना या गोपाळकाला अर्थात दही हंडीच्या शुभेच्छा  देण्यासाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा,WhatApp Status, Greetings, HD Images शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.

पौराणिक कथेनुसार, बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी गोकुळात घरोघरी जाऊन उंच टांगलेल्या दह्या-दुधाच्या हंडीतून लोणी चोरून खात असत. या खोडकर लीलांमुळेच कृष्णाला 'माखनचोर' असेही संबोधले जाते. याच परंपरेचे प्रतीक म्हणून आजही उंचावर हंडी बांधून ती मानवी मनोऱ्यांच्या साहाय्याने फोडण्याची प्रथा रूढ झाली आहे. नक्की वाचा:  Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात? जाणून घ्या यंदा पूजा विधी मुहूर्त .

गोपाळकाल्याच्या शुभेच्छा

Gopalkala Wishes
Gopalkala Wishes 26
Gopalkala Wishes
Gopalkala Wishes
Gopalkala Wishes

 

गोपाळकाला हा सण जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामूहिक आनंद आणि एकतेचे प्रतीक बनला आहे. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या उत्सवात सहभागी होत कृष्णभक्तीचा आणि सांघिक भावनेचा आनंद लुटतात. गोविंदा पथके अनेक दिवस आधीपासून सरावाला सुरुवात करतात आणि थर लावून हंडी फोडण्याची चुरस शहरांमध्ये पाहायला मिळते. अनेक मंडळांकडून बक्षिसांची मोठी रक्कम जाहीर केली जाते, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साधेपणाने हा सण साजरा होतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement