Olga Ladyzhenskaya यांच्या 97 व्या जन्मदिनी Google Doodle कडून आदरांजली
गुगल डुडल (Google Doodle) आज गुरुवारी (7 मार्च) रशियन गणितज्ञ ओगला लेडीशेंजकिया (Olga Ladyzhenskaya) यांना त्यांच्या 97 व्या जन्मदिनी आदरांजली वाहत आहे.
Olga Ladyzhenskaya Google Doodle: गुगल डुडलने (Google Doodle) आज गुरुवारी (7 मार्च) खास रशियन (Russian) गणितज्ञ (Mathematician) ओगला लेडीशेंजकिया (Olga Ladyzhenskaya) यांना त्यांच्या 97 व्या जन्मदिनी आदरांजली वाहत आहे. ओगला यांच्या गणितामधील सूत्रांच्या मदतीमुळे ओशियोग्राफी एरोडायनमिक्स आणि वातावरणाच्या पूर्वानुमानाचा अंदाज वर्तवला जातो. गुगलने बनवलेल्या त्यांच्या आजच्या या डुडलमध्ये ओगला यांच्या फोटोसह आजूबाजूला गणित आणि त्यांची सूत्रे झळकत आहेत.
ओगला यांचा जन्म 7 मार्च 1922 रोजी कोलोग्रिव शहरात झाला होता. तसेच ओलेगा यांचे वडीलसुद्धा गणिताचे शिक्षक होते. त्यामुळेच ओगला यांची गणित विषयातील उत्सुकता आणखी वाढली होती. तसेच ओगला यांच्या वडिलांनी त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गणित शिकवायचे. त्यामुळे ओगला यांना गणित सोडवणे सोपे जायचे. ओगला यांच्या यशाच्या पाठी वडिलांची साथ असल्याचे श्रेय त्यांना दिले जाते. गणितात एकदा का आवड निर्माण झाली की ओगला ह्या कठीणातील कठीण गणित अगदी सहजपणे सोडवत असत.
ओगला यांचे शिक्षण उत्तम प्रकारे सुरु होते. त्याचवेळी सोवियत संघ यांच्या एका संस्थेद्वारे 1937 रोजी ओगला यांच्या वडिलांना अटक करण्यात आल्यानंतर हत्या करण्यात आली. वडिलांच्या मृत्यूनंतर ओगला यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी लेनिनगार्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. आपली मेहनतीच्या जोरावर ओगला यांनी डॉक्टरकीची पदवी संपादन केली. काम करण्यासोबत स्टकलोव इंस्टीट्यूट येथे शिकवणे आणि रिसर्च करण्यासाठी संधी मिळाली. ओगला यांना फील्ड्स मेडल, क्लॉस रोथ आणि रेने थॉम अशा पुरस्कराने गौरविण्यात आले आहे.
पार्शियल डिफरेंशल आणि फ्लुइड डायनामिक्स क्षेत्रात ओगला यांनी आपले विशेष योगदान दिले आहे. तसेच महान गणितज्ञ इवान पेट्रोव्स्कीची उत्तम विद्यार्थीनी सुद्धा म्हणून ओगला यांना सन्मान मिळाला आहे. त्यांनी नेवियर-स्टोक्स समीकरणाला फायनाइट डिफरेंस मथेडचा उपयोग करुन गणित सोडवणारी ओगला ही पहिली महिला आहे. 2002 रोजी ओगला यांना लोमोनोसोव गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 12 जानेवारी 2014 रोजी ओगला यांचा मृत्यू झाला. मात्र आजही गणित क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे मानले जाते.