Google एप्रिल फूल प्रँक यंदा नाही करणार साजरा, Coronavirus Pandemic  पार्श्वभूमीवर घेतलना निर्णय

मात्र, बिझनेस इनसाइडरने (द वर्जच्या माध्यमातून) एक अंतर्गत ईमेल केला आहे. ज्यात कंपनीद्वारे हा इव्हेंट रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Pandemic: कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन Google यंदा आपल्या वार्षिक एप्रिल फूल प्रँकमध्ये (April Fools’ Day 2020 Pranks Canceled) सहभागी होणार नाही. गूगल असा निर्णय घेऊन अशी चर्चा या आधीच होती. अवघे जग COVID-19 या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर या संकटाविरोधात लढा देणाऱ्या देशांचा, तेथील नागरिकांचा सन्मान म्हणून गूगलने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यंदाचा गूगल एप्रिल फूल प्रँक रद्द केल्याची गूगलने अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, बिझनेस इनसाइडरने (द वर्जच्या माध्यमातून) एक अंतर्गत ईमेल केला आहे. ज्यात कंपनीद्वारे हा इव्हेंट रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. गूगलने या मेलमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस या साथिच्या आजाराविरोधात लढणाऱ्या नागरिकांच्या सन्मानार्थ आम्ही हा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी मात्र ही परंपरा कायम ठेवली जाईल. दरम्यान, अपेक्षीत आहे की, पुढच्या वर्षीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात राहील.

गूगलने आपल्या अंतर्गत ईमेलमध्ये हेही म्हटले आहे की, आम्ही केवळ सेंट्रलाइज्ड एप्रिल फूल प्रँक न करण्याचाच निर्णय घेतला नाही. तर, इतर सर्व टीममधूनही इंटरनल किंवा एक्सटर्नल कोणताही विनोद न करण्याची विनंती केली आहे. गूगलच्या वार्षिक एप्रिल फूल प्रँकमध्ये खास करुन एक वेगळेच फीचर प्रोडक्ट होते. जे नवे असते. गेल्या वर्षी कंपनीने Google Tulip सादर केले होते. हा एक AI होता. जो हे समजू शकत होता की Tulip काय सांगत आहेत. (हेही वाचा, Google 3D Animals: Tiger, Giant Panda, Lion यांच्यासह विविध प्राणी-पक्षी क्वारंटाइनच्या काळात 3D इफेक्टमध्ये तुमच्या भेटीला!)

आपेक्षा केली जात आहे की, गूगलच्या निर्णयाप्रमाणेच इतरही कंपन्या एप्रिल फूल प्रँक साजरा न करण्याचा निर्णय घेतील. यात पहिल्यांदा गूगलने हीसुद्धा घोषणा केली की, कंपनी कोरोना महामारीशी झुंजणाऱ्या व्यवसाय आणि आरोग्य एजन्सींना 800 मिलियन डॉलर डोनेट करेन. गूगल ही रक्कम रोख, एड क्रेडिट्स आणि क्लाउड सर्विसच्या माध्यमातून ऑफर करेन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif