Karwa Chauth 2022 Gift Ideas For Wife: करवा चौथचा उत्सव आणखी खास बनवण्यासाठी तुमच्या पत्नीला द्या 'हे' खास गिफ्ट
पत्नीसाठी ही करवा चौथची भेट साडी, दागिने, पादत्राणे, मोबाइल, मेकअप किट किंवा इतर काहीही असू शकते. या भेटवस्तू तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता.
Karwa Chauth 2022 Gift Ideas For Wife: यंदा करवा चौथ व्रत 13 ऑक्टोबरला आहे. विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्र उगवल्यानंतर त्या चंद्राला पाहून उपवास सोडतात. असे मानले जाते की, हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलींनी हे व्रत पाळल्यास त्यांना इच्छित वर प्राप्त होतो. करवा चौथ 2022 चा उपवास देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
करवा चौथनिमित्त तुम्ही आपल्या पत्नीला आनंदी आणि खास वाटण्यासाठी काही भेटवस्तू देऊ शकतात. पत्नीसाठी ही करवा चौथची भेट साडी, दागिने, पादत्राणे, मोबाइल, मेकअप किट किंवा इतर काहीही असू शकते. या भेटवस्तू तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. (हेही वाचा - Kojagiri Purnima 2022: शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' खास उपाय; तुमच्यावर वर्षभर होईल धनाचा वर्षाव)
करवा चौथ 2022 पत्नीसाठी भेटवस्तू आयडिया -
करवा चौथ हे पती-पत्नीमधील प्रेम, सौहार्द आणि पूर्णतेचे प्रतीक आहे. अशा वेळी पत्नीसाठी करवा चौथची भेटही खास असावी. येथे आम्ही तुम्हाला पत्नीसाठी काही खास करवा चौथ गिफ्ट कल्पनांची यादी दिली आहे, ज्या तुम्ही खरेदी करू शकता, चला तर मग या करवा चौथ गिफ्ट आयडियाबद्दल जाणून घेऊया...
खास बांधणी साडी -
तुम्ही करवा चौथ निमित्त आपल्या पत्नीसाठी खास बांधणीची साडी घेऊ शकता. ही अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. यामध्ये तुम्हाला अनेक कलर ऑप्शन्स मिळू शकतात. तुमच्या पत्नीच्या आवड्या रंगाची साडी तुम्ही खरेदी करू शकता. भरतकामा असलेली ही सुंदर आणि मनमोहक साडी तुमच्या पत्नीला नक्की आवडेल.
स्मार्टवॉच -
करवा चौथ निमित्त तुम्ही आपल्या पत्नीला लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच देऊ शकता. तुम्ही अॅमेझॉनवर boAt Xtend Smartwatch with Alexa Built-in हे स्मार्टवॉच घेऊ शकता. हे स्मार्टवाच 1.6 लाखांहून अधिक लोकांनी विकत घेतले आहे. यासोबत तुम्हाला अलेक्सा व्हॉईस असिस्टन्सचे फीचर मिळेल. यामध्ये तुम्हाला 14 स्पोर्ट्स मोड मिळतात. यात एक शक्तिशाली बॅटरी आहे, जी 7 दिवस टिकते. भारतातील हे बेस्ट स्मार्टवॉच तुम्ही ब्लूटूथच्या मदतीने मोबाईलशी कनेक्ट करू शकता. या boAt स्मार्टवॉच किंमत 1999 रुपये आहे.
मेकअप किट -
तुम्ही आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून मेकअप किट घेऊ शकता. The Moms Co. Face Care Kit ही तुमच्या पत्नीसाठी करवा चौथची सर्वोत्तम भेट ठरू शकते. सर्व महिलांना त्यांच्या त्वचेची काळजी घेणे आवडते. हे आलिशान स्किनकेअर किट त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला फेस वॉश, फेस क्रीम, फेस सीरम, अंडर आय क्रीम मिळते. द मॉम्स कं. फेस केअर किटची किंमत 1317 रुपये आहे.
मलबार डायमंड रिंग -
तुम्ही आपल्या पत्नीसाठी सोन्याची आणि हिऱ्याची अंगठी घेऊ शकता. ही अंगठी अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. तुम्ही या करवा चौथला ती आपल्या पत्नीला भेट देऊ शकता. मलबार डायमंड रिंगची किंमत 13370 रुपये आहे.
परफ्यूम -
या करवा चौथला तुम्ही तुमच्या पत्नीला परफ्यूम देऊ शकता. तुम्ही आपल्या पत्नीला तिचा आवडता परफ्यूम गिफ्ट म्हणून देू शकता.
हाय हील्स -
जर तुमच्या पत्नीला हील्स घालायला आवडत असतील तर तुम्ही तीला करवा चौथचं गिफ्ट म्हणून हील्स गिफ्ट करू शकता. ही एक सर्वोत्तम करवा चौथ गिफ्ट आयडिया आहे. हाय हील्स खूप सुंदर आणि स्टाइलिश दिसतात. करवा चौथच्या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला या वुमेन्स हील्स देऊन बाहेर डिनरला घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकता.
क्लच बॅग किंवा पर्स -
तुम्ही आपल्या पत्नीला Lavie Women's Clutch Bag किंवा चांगल्या ब्रँडची पर्स गिफ्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक कलर ऑप्शन्स मिळतील. तुम्ही तुमच्या पत्नीच्या आवडीच्या कलरनुसार पर्स खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या पत्नीला खूप स्टायलिश, ट्रेंडी आणि सुंदर लुक मिळेल.