Eid Mubarak 2023 HD Images: रमजान ईद निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS द्वारे द्या खास शुभेच्छा!
Eid Mubarak (PC - File Image)

Eid Mubarak 2023 HD Images:  यावर्षी 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. रमजानचा पाक महिना चंद्र पाहिल्यानंतरच सुरू होतो आणि या महिन्याच्या शेवटी ईदचा सणही चंद्र पाहूनच साजरा केला जातो. यामुळेच ईदची निश्चित तारीख ठरलेली नाही. ही ईद दरवर्षी चंद्र उगवल्यानंतरच साजरी केली जाते. ईद-उल-फित्र, चंद्र रात्रीनंतर सकाळी साजरा केला जातो, हा जगभरातील मुस्लिमांकडून साजरा केला जाणारा एक प्रमुख धार्मिक सण आहे. रमजान महिन्यातील उपवास ईदच्या दिवशी संपतो.

या पवित्र महिन्यात, मुस्लिम समाजातील लोक एक उपवास पाळतात ज्यामध्ये ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. शव्वाल हा इस्लामिक चंद्र कॅलेंडरमधील दहावा महिना आहे आणि या महिन्याचा पहिला दिवस जगभरात ईद-उल-फित्र म्हणून साजरा केला जातो. दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना खास रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. (हेही वाचा - Ramzan Eid 2023 Latest Mehndi Design: रमजान ईदच्या निमित्ताने मेहंदी लावून तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवा, या ट्रेंडी मेहंदी डिझाइन्स मधून घ्या आइडिया (Watch Video))

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

रमजानच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…

ईद मुबारक हो!!!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

रमजान ईद निमित्त

तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य,

सुख संपत्ती लाभो

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

सर्व मुस्लिम बांधवांना,

रमजान च्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)
Eid Mubarak (PC - File Image)

ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव शेवयाची खीर बनवतात. जगभरात ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1 महिना उपवास केल्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो.