Krishna Janmashtami 2024 Messages in Marathi: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त Greetings, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमय शुभेच्छा!
या दिवशी तुम्ही कृष्ण जन्माष्टमी मराठी कोट्स, कृष्ण जन्माष्टमी व्हॉट्सअॅप स्टेटस, कृष्ण जन्माष्टमी मेसेज, कृष्ण जन्माष्टमी ग्रेटिंग्ज शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.
Krishna Janmashtami 2024 Messages in Marathi: द्रिक पंचांगनुसार, अष्टमी तिथी 26 ऑगस्टला आहे. अष्टमी तिथीनुसार, 27 ऑगस्टला पहाटे 02:19 वाजता संपेल. जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) हिंदू परंपरेनुसार साजरी केली जाते. कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत झाला असे मानले जाते. भगवान कृष्णाच्या 5251 व्या जयंतीनिमित्त, हा सण संपूर्ण भारतातील लाखो भक्तांद्वारे उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी कृष्णभक्त एकमेकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतात. भक्त जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेपर्यंत उपवास करतात. या दिवशी कृष्णाचे मंदिर खास फुलांनी सजवले जाते. तसेच कृष्णाला दूध आणि पाण्याने स्नान घातले जाते. या दिवशी तुम्ही कृष्ण जन्माष्टमी मराठी कोट्स, कृष्ण जन्माष्टमी व्हॉट्सअॅप स्टेटस, कृष्ण जन्माष्टमी मेसेज, कृष्ण जन्माष्टमी ग्रेटिंग्ज शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी)
आला श्रावण उधळत रंग
गोविंदा न्हाहले रंगात
दहीहंडीचा घेता वेध
आनंद भरलाय गगनात.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि
भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….
तुम्हाला चांगल्या जीवनासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..
जन्माष्टमीच्या खूप
खूप शुभेच्छा
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
गोकुळाष्टमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा..!
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत
ज्याने रचला रास यशोदा,
देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्माष्टमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडतो. या दिवशी कृष्णाची मिरवणुक काढण्याचीही परंपरा आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी, दही हंडीचा उत्सव पार पडतो.