Ganpati Visarjan Dates 2020: घरगुती दीड दिवसांच्या बाप्पाचे, गौरी गणपती विसर्जन ते 10 दिवसांनी गणरायाचे पहा यंदा कधी होणार विसर्जन!

मग जाणून या यंदाच्या गणेशोत्सवामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणरायांच्या मूर्तीचं विसर्जन (Ganesh Visarjan) कोणत्या दिवशी केले जाणार आहे?

Ganpati Visarjan| Photo Credits: Unsplashed.com

Ganeshotsav 2020:  महाराष्ट्रासह जगभरात गणेशभक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणपतीची भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा करतात. त्यानंतर घरगुती गणपती किमान दीड दिवस ते दहा दिवस विराजमान असतात. विघ्नहर्ता गणरायाच्या पूजेनंतर त्याला तितक्याच आस्थेने निरोप देखील दिला जातो. मग जाणून या यंदाच्या गणेशोत्सवामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणरायांच्या मूर्तीचं विसर्जन (Ganesh Visarjan) कोणत्या दिवशी केले जाणार आहे? Ganeshotsav 2020: यंदा गणेशोत्सव हरितालिका, ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन कधी? जाणून घ्या तारखा!

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असल्याने बाप्पाला निरोप देताना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणपती मूर्ती असल्यास त्यांना घरच्या घरीच निरोप दिला जाईल. तर अनेक ठिकाणी सोसायटी, चाळींमध्ये कृत्रिम तलाव तयार करून बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. चौपाट्या आणि तलावांमध्येही गणेश विसर्जन केले जाईल मात्र या ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Ganeshotsav 2020: मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे किंवा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी BMC ने जाहीर केल्या विशेष सूचना

गणेश विसर्जन 2020 तारखा

दीड दिवसांचे गणपती

22 ऑगस्टला गणपतीचे पूजन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी दीड दिवसांचे गणपती 23 ऑगस्ट दिवशी विसर्जित केले जाणार आहे.

पाच दिवसांचे गणपती

पाच दिवसांचे घरगुती गणपती 26 ऑगस्ट दिवशी विसर्जित केले जातील.

गौरी-गणपती विसर्जन

गणपतींसोबत ज्या घरात गौराईचं आगमन होते त्या ठिकाणी मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अशा घरगुती गौरी-गणपतींचं विसर्जन 26 ऑगस्ट दिवशी केले जाईल.

10 दिवसांचे गणपती

अनंत चतुर्दशी म्हणजे 1 सप्टेंबर  दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन केले जाते. यामध्ये घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती मूर्तींचादेखील समावेश असतो.

यासोबतच काही घरात विशिष्ट दिवसांचे गणपती विराजमान होतात. त्यांचे विसर्जन दिवसांच्या गणतीने केले जाते. त्यामध्ये 3 दिवसांचा गणपती 24 ऑगस्ट, 7 दिवसांचा गणपती 27 ऑगस्ट दिवशी विसर्जित केला जाईल.

महाराष्ट्रात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या धामधुमीवर देखील बंधनं घालण्यात आली आहेत. यंदा गणपतीची मूर्ती कमाल 4 फूटांची आहे. त्यामुळे लालबागचा राजा यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार आहे. जीएसबी वडाळा भाद्रपदाऐवजी माघी गणेशोत्सव साजरा करेल. तर गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा लहान मूर्त्यांची पूजा करणार आहे.