Ganpati Visarjan 2020 Muhurat: अनंत चतुर्दशी निमित्त 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपती बाप्पांचे विसर्जन, जाणून घ्या विधी

या सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री वेगवेगळे शुभ मुहूर्त आहेत

Ganesh Visarjan | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता आला नाही याची रुखरुख अनेक गणेश भक्तांच्या मनात कायम राहिल. मात्र तरीही सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत अगदी साधेपणाने का होईना पण गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी पाहुणे म्हणून आलेच. याआधीच दीड दिवसांचे, 5 दिवसांचे आणि 7 दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. आता गणेश चतुर्थीनंतर 10 दिवसांनी येणारा अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) च्या दिवशीही मोठ्या गणपतींसह घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) साजरी केली जाते. दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. त्यामुळे या दिवशी विसर्जनचा शुभमुहूर्त आणि पूजा विधी थोडक्यात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) विधी कशी असावी हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असेल.

यंदा 1 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आली आहे. या सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री वेगवेगळे शुभ मुहूर्त आहेत. Anant Chaturdashi 2019: अनंत चतुर्दशी दिवशी का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या त्यामागची दंतकथा

सकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: सकाळी 09:10 ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत

दुपारी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: दुपारी 3.32 ते सायंकाळी 5.07 वाजेपर्यंत

संध्याकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: संध्याकाळी 8.20 ते 9.32 वाजेपर्यंत

रात्री गणेश विसर्जनाचा मुहूर्त: रात्री 10.56 ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत

गणेश विसर्जनाची विधी

तमाम गणेश भक्तांना भावूक करणारा असा हा अनंत चतुर्दशीचा दिवस असला तरीही बाप्पाने पुढच्या वर्षी लवकर यावे यासाठी तितकाच जल्लोषात, आनंदात साजरा केला जातो.