Ganeshotsav 2022: एक गाव एक गणपती, डहाणूकरांचा अनोखा उपक्रम

एक गाव एक गणपती या संकल्पनेतून उर्से गावकऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. एक गाव, एक गणपती' सारखी संकल्पना क्वचितचं काही ठिकाणी दिसून येते.

Sankashti Chaturthi June 2020 | (Photo Credits: Pixabay)

गणेशोत्सव म्हटलं की राज्यभरात उत्सव आणि उत्साहाचं वातावरण. घरोघरी दरोदारी लगबग असते ती बाप्पाच्या आगमनाची. आता आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमण अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलं आहे. तरी विविध गणेशमंडळ आपल्या बाप्पाच्या स्थापनेच्या तयारीला लागला आहे. गणेशोत्सव म्हणजे ऐक्याचा उत्सव. याचं ऐक्याच्या उत्सवाची व्याख्या खऱ्या अर्थाने मांडली आहे ती डहाणू तालुक्यातील डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य 'उर्से'  ह्या गावाने. या पूर्ण गावात फक्त एकचं गणपतीची स्थापना केली जाते. एक गाव एक गणपती या संकल्पनेतून उर्से गावकऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. एक गाव, एक गणपती' सारखी संकल्पना क्वचितचं काही ठिकाणी दिसून येते. अशीच 'एक गाव, एक गणपती'ची  संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या 50 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.

 

बापाच्या आगमनानं शहर, गावं, घरे, इमारती दणकून जातात. पण गणपती हे दैवत आहे ऐक्याचं, उत्सवाचं. एकत्रीत येवून गणेशोत्सव साजरा केला की बाप्पा पावतो अशी या गावकऱ्यांची समज आहे. तसेच वेगवेगळ्या मंडळात विविध घरी बाप्पाची स्थापना केल्यास उत्साह वाटतोच पण सगळे एकत्र येवून एकाचं गणपतीची स्थापना केल्यास खर्च, मेहनत या सगळ्या गोष्टी वाटून घेता येता अशी या गावकऱ्यांचं मत आहे. तरी या प्रकारच्या अनोख्या उपक्रमाला चालना देत या गावकऱ्यांनी सगळ्यां पूढे आदर्श निर्माण केला आहे. (हे ही वाचा:- ठाण्यात अवतरली अयोद्धा नगरी; Dhamankar Naka परिसरात गणेशोत्सवासाठी 120 फीट उंचीच्या राम मंदिराचा देखावा)

 

उर्से गावामध्ये तीन मंडळे एकत्रीत येवून कोणत्याही प्रकारची देणगी गावाबाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व आर्थिक खर्च स्वखर्चातून गावकरी गोळा करतात. गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर, गावातील सर्व कामं ही श्रमदनातून केली जातात.  गणपती आणि गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. वस्तूंच्या लिलावातून आलेल्या पैसे गरजवंत असलेल्या शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement