Ganeshotsav 2019: मुंबई मधील 364 गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी नाकारली

तरी मुंबई (Mumbai) मधील काही गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी मुंबई (Mumbai) मधील काही गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. यामध्ये 364 गणेश मंडळे असून त्यांनी काही अनिवार्य अटी पूर्ण न केल्याने त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. तर 328 अर्जांवर आवश्यक ती कार्यवारीह सुरु करण्यात आली आहे.

मुंबईत जवळजवळ 3500 हजार मंडळे गणेशोत्सादरम्यान मंडपाची उभारणी करतात. मात्र मंडप उभारणीसाठी या मंडळांना पालिकेकडून परवानगी मिळणे अत्यावश्यक असते. तर सध्या पालिकेने मंडप उभारणीची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली आहे. अर्ज करण्यासाठी मंडळांना 24 ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली होती.(Ganeshotsav 2019: यंदा बाप्पासाठी बनवा खास इको फ्रेंडली मखर; थर्माकॉल, प्लॅस्टिकला रामराम करून निवडा 'हे' पर्याय)

तसेच न्यायालयाने मंडप उभारणीसाठी काही नियमावली गणेशोत्सव मंडळांना लागू केले आहेत. त्यामध्ये गणपतीचा मंडप रेल्वे स्टेशन, बस स्टॉप येथे ते उभारु नयेत. मात्र रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची गाडी पोहचण्याऐवढी जागा असावी अशा अटी मंडळांना लागू करण्यात आल्या आहेत. परंतु काही मंडळांनी या अटीचे पालन न केल्याने त्यांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.