Ganeshotsav 2019: गणेश चतुर्थीला 'या' सोप्प्या व सुंदर रांगोळ्यांनी करा बाप्पाचे स्वागत (Watch Video)
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिकृती व काही सोप्प्या वेल-फुलांच्या रांगोळ्या काढून अनोख्या अंदाजात बाप्पाचे आगमन खास करायचे असल्यास या सोप्प्या डिझाइन्स नक्की ट्राय करा..
Ganeshotsav 2019 Rangoli Designs: आज, 2 सप्टेंबर, भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात झाली आहे. या निमित्ताने पुढील दहा दिवस, मुंबईसह देशभरात इतकेच नव्हे तर विदेशातही धामधूम पाहायला मिळणार आहे. आजपासून सर्वांचे लाडके बाप्पा घरोघरी, गल्लोगल्ली दीड, पाच व सात दिवसांसाठी विराजमान होतील. खरंतर कोणताही सण म्हणताच, आपसूक येणाऱ्या गोष्टींच्या यादीत रांगोळीला विशेष महत्व असते. रांगोळी (Rangoli) ही केवळ सुशोभीकरणाचेच नाही तर समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते. (Happy Ganeshotsav 2019 HD Images: गणरायाच्या आगमनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, HD Greetings, Wallpapers, Wishes देऊन करा आनंद द्विगुणित)
धार्मिक अनुषंगाने रांगोळीतील अलंकारिक आकार हे मनाला प्रसन्न करतात. य रांगोळ्यांचे देखील अनेक प्रकार प्रचलित आहेत. विविध राज्यानुसार हे प्रकार बदलत जातात. महाराष्ट्रात मुख्यत्वे संस्कार भारती (Sanksakar Bharti) रांगोळीला खास महत्व आहे. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिकृती व काही सोप्प्या वेल-फुलांच्या रांगोळ्या काढून अनोख्या अंदाजात बाप्पाचे आगमन खास करायचे असल्यास या सोप्प्या डिझाइन्स नक्की ट्राय करा.. (Ganesh Chaturthi 2019 Pran Pratishtha Muhurat: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी यासाठी मदत करतील ही खास अॅप्स!)
गणपती विशेष सोप्पी व सुंदर रांगोळी
भारतात सणांचे महत्व अनन्यसाधारण आहे त्याच प्रमाणे हे सण साजरे करण्याची पद्धतही सर्वत्र निराळी आहे. पण काहीही असले तरी भक्ति भावाने एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने साजरा केलेला प्रत्येक सोहळा हा खास ठरतो, याच प्रमाणे यंदाचा गणेशोत्सव आपल्यासाठी मंगलमय ठरवा अशी सदिच्छा! गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!