Ganesh Chaturthi 2019: गणपतीची लांब सोंड, मोठ पोट, बारीक डोळे असं गणेशाचं रूप जाणून घ्या नेमकं कशाचं प्रतिक आहे? या आहे त्यामागील अध्यात्मिक संकेत
अनेक भाविकांना त्यामागील नेमकी भावना आणि अर्थ ठाऊक नाही. यंदा गणेश चतुर्थी दिवशी बाप्पा समोर नतमस्तक होण्यापूर्वी त्याच्या मूर्ती मागील धार्मिक, अध्यात्मिक अर्थ काय सांगतोय
महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशाच्या पार्थिव पूजनाचे महत्त्व आहे. 'गणेश' याचा अर्थ 'गणांचा ईश' किंवा प्रभू असा होतो. गण म्हणजे भगवान शंकर आणि पार्वतीचे सेवक. हिंदू धर्मामध्ये गणेश म्हणजेच गणपती बाप्पाला बुद्धीची देवता, संकंटांचा नाश करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. मग आज गणेश चतुर्थीचे औचित्य साधून घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची पूजा केली आहे. मग जाणून घ्या ज्या गणेश मूर्तीची आपण पूजा करणार आहोत त्या गणरायाचे लांब पोट, सुपासारखे कान, हत्तीची सोंड नेमकं कशाचं प्रतीक आहे?
वर्षानुवर्षे हिंदू धर्मीय विशिष्ट स्वरूपातील गणेश मूर्तीची पूजा केली जाते. या गणेश मूर्तीच्या ठेवणीमध्ये काही अर्थ दडला आहे. अनेक भाविकांना त्यामागील नेमकी भावना आणि अर्थ ठाऊक नाही. यंदा गणेश चतुर्थी दिवशी बाप्पा समोर नतमस्तक होण्यापूर्वी त्याच्या मूर्ती मागील धार्मिक, अध्यात्मिक अर्थ काय सांगतोय हे जाणून घ्या नक्की. Ganesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव
मोठं डोकं
पुराणात भगवान शंकरांनी गणपतीचं डोकं रागाच्या भरात छाटल्यानंतर त्याला गणपतीचं डोकं लावून पुन्हा सजीव केलं गेल्याची आख्यायिका आहे. गणपतीचं मोठं डोकं हे मोठं विचार करण्याचं प्रतीक समजलं जातं. साऱ्या प्राण्यांमध्ये हत्तीचं डोकं हे सगळ्यात मोठं आणि बुद्धिवान आहे. त्यामुळे बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाचं मोठ डोकं प्रगल्भ विचार, डिटरमिनेशन, शक्तीच प्रतीक मानलं जातं.
बारीक डोळे
हत्तीचे आणि पर्यायाने गणपती बाप्पाचे बारीक डोळे हे एकाग्रतेचे प्रतीक आहे. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमधून तुमच्या साठी जास्तीत जास्त शिकण्या सारखं काय असेल? हे निराखायला, आत्मसात करायला शिका.
मोठे कान
बाप्पाचे मोठे कान हे सारं ऐकून घेण्याची वाढवण्याची वाढवण्यास सांगते. पण हे मोठे कान जसे सारं ऐकून घेण्यासाठी आहे तसेच नकोशा गोष्टी सोडून द्यायला शिका.
सोंड
गणपती बाप्पाची सोंड ही अनुकूलनक्षमता याचं प्रतीक आहे. परिस्थिती नुसार जुळवून घेण्याची वाढवा आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्या. बाप्पाच्या सोंडेने जसा बालगणेशा खेळात रमला तसंच सोंडेने त्याने अनिष्टांवर वारही केले. गणपतीची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या? कशी निवडाल गणेश मूर्ती
मोठं पोट
गणपतीचं मोठं पोट हे आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायला शिकवतं. सारं काही सामावून घ्यायला शिका असा त्यामागील उद्देश आहे. आयुष्यातले कडू, गोड प्रसंग पचवा आणि पुन्हा नव्या आव्हानांना सामोरं जायला शिका.
गणपती हा गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखला जातो. शुभकार्यात अग्रस्थानी पुजेचा मान असलेली ही देवता तुम्हांला या गणेश चतुर्थी दिवशी सुख, समृद्धी, मांगल्य घेऊन येवो हीच आमची त्यांच्या चरणी प्रार्थना!
(टीप: सदर लेखाचा उद्देश हा केवळ माहिती देण्याचा आहे. लेटेस्टली कोणत्याही श्रद्धा, अंधश्रद्धांचे समर्थन करत नाही.)