Gandhi Jayanti 2026 Images: गांधी जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Status शेअर करत साजरा करा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस

Gandhi Jayanti Images

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती २ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे.  सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या तत्त्वांवर आधारित त्यांचा विचार आजही मार्गदर्शक मानला जातो. या दिवसानिमित्त शाळा, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होतात. भारतात २ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग अवलंबला. असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन हे त्यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख टप्पे मानले जातात.

संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्ये २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला. त्यामुळे गांधी जयंतीला जागतिक पातळीवरही महत्त्व आहे. मग अशा यया महत्त्वाच्या दिवशी गांधी जयंतीच्या शुभेच्छा  WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा शेअर करत गांधीजींच्या स्मृतीला वंदन करून या दिवशी त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करा.

गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Gandhi Jayanti Images
अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या महात्मा गांधींना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
Gandhi Jayanti Images
स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
Gandhi Jayanti Images
सत्य, अहिंसा आणि शांतता यांचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींना विनम्र अभिवादन.
Gandhi Jayanti Images
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
Gandhi Jayanti Images
अहिंसा हेच खरे बळ, हा बापूंचा संदेश आचरणात आणूया. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

गांधीजींची शिकवण केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही. स्वच्छता, संयम आणि संवादातून प्रश्न सोडवण्याचा त्यांचा आग्रह आजही रोजच्या जीवनात लागू होतो. गांधी जयंतीच्या निमित्ताने अनेक संस्था स्वच्छता मोहिमा, श्रमदान आणि प्रार्थनासभा आयोजित करतात.

आजचा हा गांधी जयंतीचा  दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता न ठेवता, त्यांच्या विचारांपैकी एखादे मूल्य आचरणात आणण्याचा संकल्प करणे हीच बापूंना खरी आदरांजली मानली जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement