Gandhi Jayanti 2024 Wishes In Marathi: गांधी जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा शेअर करत महात्माजींच्या स्मृतीला करा अभिवादन
15 जून 2007 दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे.
महात्मा गांधीजींनी (Mahatma Gandhi) सत्य आणि अहिंसेच्या बळावर आंदोलन उभं करत भारताला ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून मुक्त केले. या स्वातंत्र्यचळवळीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली. भारतात महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणून देखील ओळखले जाते. गुजरातच्या पोरबंदर मध्ये जन्म झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांची यंदा 155 वी जयंती 2 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने WhatsApp Status, Wishes, Quotes, Messages, Greetings शेअर करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करा.
मोहनदास करमचंद गांधी यांना 'महात्मा' किंवा' बापू' म्हणूनही संबोधलं जातं. त्यांच्या जीवनामध्ये सत्य, अहिंसा यांना महत्त्व होते. स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळे जनसामान्यांचं अलोट प्रेम त्यांनी कमावले होते. Dry Days in Maharashtra: गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ड्राय डे, जाणून घ्या, आणखी कोणत्या दिवशी दारूविक्रीवर बंदी.
गांधी जयंतीच्या शुभेच्छा
15 जून 2007 दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे. या दिवशी भारतामध्ये नेते मंडळी नवी दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधी राजघाटावर श्रद्धांजली अर्पण करतात. प्रसंगी महात्मा गांधींचे आवडते गाणे, रघुपती राघव राजा राम हे देखील गायले जाते.