Gandhi Jayanti 2020 Virtual celebration Ideas: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा व्हर्च्युअल जगात गांधी जयंती कशी साजरी कराल?

त्यानिमित्तानेही जनमाणसांमध्ये गांधीजींच्या विचारांचा प्रसार केला जातो. मग या दोन्ही दिवसांची सांगड घालत पहा कोरोना संकटकाळात कशी साजरी कराल गांधी जयंती?

गांधी जयंती (Photo Credit: Twitter)

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा जन्म दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती (Gandhi Jayanti) म्हणून साजरा केला जातो. गांधीजींच्या जन्म दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या विचारांचा वसा विविध माध्यमातूनपुढल्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी भारतामध्ये गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महात्मा गांधी जयंती यांनी जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुणतेचा वसा दिला आहे. त्यामुळे भारतामध्ये शाळा- कॉलेज अशा शैक्षनिक संस्थांमधून गांधी जयंती च्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. सध्या शाळा, कॉलेज बंद असल्याने हे सेलिब्रेशन ऑनलाईन माध्यमातून, व्हर्च्युअल जगात केले जाणार आहे. मग यंदा तुम्ही देखील व्हर्च्युअल जगात सेलिब्रेशन करणार असाल तर पहा तुमच्याकडे कोणकोणते पर्याय आहेत? Gandhi Jayanti 2020: गांधी जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या बापूंच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

अहिंसेची शिकवण देणार्‍या महात्मा गांधीजींच्या जन्मदिनी आता जागतिक अहिंसा दिन म्हणून देखील ओळखले जाते. त्यानिमित्तानेही जनमाणसांमध्ये गांधीजींच्या विचारांचा प्रसार केला जातो. मग या दोन्ही दिवसांची सांगड घालत पहा कोरोना संकटकाळात कशी साजरी कराल गांधी जयंती?

कोरोना संकटकाळात गांधी जयंती साजरी करण्यासाठी खास आयडिया

गांधी जयंतीचं औचित्य साधत तुम्ही मुलांना महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्याशी निगडीत काही विषय देऊन मिनिटाभराचं भाषण करण्याचं आवाहन करू शकता. तसेच विद्यार्थ्यांना निबंध पाठवण्यासाठी देखील आवाहन करू शकता.

महात्मा गांधींजींची ओळख त्यांची साधी रहाणी, धोतर, काठी, चष्मा, चरखा ही होती. त्याचा वापर करत तुम्ही मुलांना गांधींजीच्या वेशभुषेमध्ये मुलांना सजवू शकता.

महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना लक्षात घेता तुम्ही मुलांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करू शकता. यामुळे एकाचवेळी त्यांना गांधींजींबद्दल अनेक माहिती देऊ शकता.

गांधीजींनी अहिंसेसोबतच नेहमी खरं बोलण्याचा संदेश जनमाणसांमध्ये रूजवला आहे. त्यामुळे यंदा गांधी जयंतीच्या दिवशी मुलांना दिवसभर खरं बोलण्याचा एक उपक्रम पाळण्याचे आवाहन करा. त्यानंतर त्यांना अनुभव शेअर करायला सांगा. यामधून त्यांना खरं बोलण्यामुळे झालेले फायदे पटवून द्या.

गांधीजींच्या आयुष्यातील काही घटनांचा संदर्भ घेत मुलांना त्यांची चित्रकला कौशल्यं खुलवायला संधी द्या.

मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापुजी या नावाने ओळख असलेल्या महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 साली झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अहिंसेचा मार्ग स्वीकरत त्यांनी भारताची ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून सुटका करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.