Friendship Day 2020: फ्रेंडशीप डे निमित्त घराच्या घरी Friendship Bands कसे बनवाल?
त्यामुळे यंदाचा फ्रेंडशिप डे नक्कीच खास होईल आणि तुमचे DIY कौशल्य पाहून मित्र-मैत्रिणी खूश होतील.
कोणत्याही नात्यात मैत्री असेल तर ते नाते अधिक सहज, सुंदर होते. मित्रांचा सल्ला प्रत्येक टप्प्यावर घेतला जातो. तर मित्र-मैत्रिणींशी नुसत्या गप्पा मारल्या तरी फार बरे वाटते. इतके मैत्रीचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्व आहे. त्यामुळे क्ताचे नसले तरी मैत्रीच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. यारी-दोस्तीच्या या नात्याचा उत्सव ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा फ्रेंडशिप डे (Friendship Day) 2 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. फ्रेंडशिप डे चा उत्साह कॉलेजच्या तरुणांमध्ये अधिक असतो. फ्रेंडशिप डे निमित्त बांधले जाणारे बँड्स, मार्करने हातावर, टी-शर्ट्सवर लिहिली जाणारी नावं आणि नुसती धम्माल.
यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे मित्रपरीवाला भेटून फ्रेंडशिप डे साजरा करता येणार नाही. त्यातच कॉलेजेस बंद असल्याने मैत्री दिनाच्या धम्माल, मस्तीला अनेकजण मुकणार आहेत. मात्र नाराज होण्याचे कारण नाही. यंदा फ्रेंडशिप डे खास करण्यासाठी तुम्ही होममेड फ्रेंडशिप बँड बनवून मित्रमंडळींना पाठवू शकता. त्यामुळे यंदाचा फ्रेंडशिप डे नक्कीच खास होईल आणि तुमचे DIY कौशल्य पाहून मित्र-मैत्रिणी खूश होतील. तर कस्टमाईज बँड्सने ब्रेस्ट फ्रेंडला नक्कीच खूप स्पेशल वाटेल. (Happy Friendship Day 2020: बेस्ट फ्रेंड सोबत भांडण झाल्यानंतरही 'फ्रेंडशीप' टिकवण्यासाठी मदत करतील या 5 टीप्स!)
घरच्या घरी Friendship Bands कसे बनवाल?
मैत्रीत प्रेम, आपुलकी, काळजी, जिव्हाळा, राग, रुसवा, भांडण सारं काही असतं. त्यामुळे आलेला राग सोडून आणि झालेले भांडणं विसरुन पुन्हा एकदा मैत्रीला नवी संधी द्या. यंदाच्या फ्रेंडशीप डे निमित्त तुमच्यातील विश्वासाचा धागा या होममेड फ्रेंडशीप बँड्च्या माध्यमातून अधिक घट्ट होवो, याच शुभेच्छा!