Friendship Day 2020 Funny Messages: फ्रेंडशिप दिनानिमित्त Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून आपल्या अंतरंगी मित्रांना द्या मजेशीर शुभेच्छा!

आपल्या आयुष्यात संकटसमयी धावून आलेल्या आपल्या जिवलग मित्रांना थोड्या हटके अंदाजात शुभेच्छा देण्यासाठी खास मजेशीर शुभेच्छा:

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

Friendship Day Funny Messages: यंदा लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नाहीतर सर्वसामान्यपणे या महिन्यापर्यंत ही सुरु झालेली असताता. या महिन्याच्या पहिल्या रविवारी येणा-या फ्रेंडशिप डे (Friendship Day) ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या जुन्या मित्रांना, तसेच नवीन बनलेल्या मित्रांना हातावर फ्रेंडशिप बँड बांधून शुभेच्छा दिल्या जातात. यंदा या दिवसावर कोरोनाचे सावट असले तरीही तुम्ही घरात राहून तुमच्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या मनसोक्त शुभेच्छा देऊ शकतात.

आपल्या आयुष्यात संकटसमयी धावून आलेल्या आपल्या जिवलग मित्रांना थोड्या हटके अंदाजात शुभेच्छा देण्यासाठी खास मजेशीर शुभेच्छा:

गर्लफ्रेंड ला कॅफेत घेऊन जाण्यापेक्षा मित्रांची शिवी ऐकूनही हॉटेलात जेवायला घेऊन जाणा-या दिलदार मित्राला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

कॉफी देण्याच्या बाता मारून टपरीवरील कटिंग चाय वर फुटविणा-या कंजूस मित्र/मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा- Happy Friendship Day 2020 Messages: मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आपल्या जिवलग मित्रांना करा खूश!

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

नाक्यावर बसून आपण राहत असलेल्या भागातील प्रत्येकाच्या घरातील खडानखडा माहिती देणा-या मातब्बर वार्ताहर मित्रांना Happy Friendship Day!

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

तुमच्या गर्लफ्रेंडसमोर जाणून-बुजून तुमच्या एक्स गर्लफ्रेंडचा विषय काढणा-या आगलाव्या मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा- Friendship Day च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांसोबत Video Calling दरम्यान 'या' भन्नाट गोष्टी करुन द्या Surprise!

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

बॉयफ्रेंड सोबत फिरायला जाण्यासाठी हुशार मैत्रिणीचे नाव सांगणा-या स्कॉलर मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Friendship Day Funny Messages (Photo Credits: File)

आपल्या जीवनातील अनेक टप्प्यात असे काही अंतरंगी मित्र मिळता ज्यांच्या खोडकर, निरागस वृत्तीमुळे ते आपल्या कायम स्मरणात राहतात. अशा मित्रांची एक आठवण म्हणून या मजेशीर फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा तुमच्या नक्कीच कामी येतील.

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif