Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट!
आज पाहूयात फादर्स डे च्या दिवशी वडिलांना खुश करण्यासाठी त्यांना काय गिफ्ट देऊ शकाल.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचे स्थान खुप महत्वाचे असते. या दोघांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन दिवस निश्चित केले आहेत. मे महिन्याचा पहिला रविवार आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे नावाने साजरा केला जातो. तर जून महिन्यातील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 20 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हा दिवस हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉल्समध्ये जाता येणार नसल्याने घरी बसल्या सोप्पे आणि स्वस्त भेटवस्तू आपण आपल्या वडिलांसाठी बनवू शकता. आज पाहूयात फादर्स डे च्या दिवशी वडिलांना खुश करण्यासाठी तुम्ही त्यांना काय गिफ्ट देऊ शकाल. (Father's Day 2020 Wishes: पितृदिन निमित्त मराठी शुभेच्छा, Quotes, Images, Messages, Greetings शेअर करून द्या फादर्स डे च्या शुभेच्छा )
फोटो कोलाज
तुमच्याकडे तुमचे आणि तुमच्या वडिलांचे फोटो कलेक्शन असेल तर त्यातले खास फोटो वापरून तुम्ही एक छानसा फोटो कोलाज करू शकता आणि तो गिफ्ट म्हणून बाबांना देऊ शकता. हे कोलाज वडील जेव्हा जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना तुमच्यासोबत व्यतीत केलेले क्षण आठवतील.
त्यांचा आवडता पदार्थ
जर तुमचे बाबा फूडी असतील तर त्यांच्यासाठी एक खास गोष्ट तुम्ही करू शकता. सामान्य परिस्थितीत तुम्ही बहुधा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेला असता. मात्र यंदा कोरोनामुळे आपल्याला तसे करणे शक्य नाही तेव्हा तुम्हीच त्यांचे 'मास्टर शेफ' बना आणि त्यांच्यासाठी त्यांचा एखादा आवडीचा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घाला.
सारेगम कारवाॅंन
गाणी ऐकणे कोणाला आवडत नाही. खास करुन जूनी गाणी आपल्या आई वडिलांना जास्त आवडतात. तुमच्या वडिलांना ही गाणी ऐकण्याचा शौक असेल आणि तुमचे गिफ्ट बजेट 3000- 5000 हजारांच्या जवळपास असेल तर तुम्ही सारेगम कारवाॅंन बाबांना गिफ्ट म्हणून देऊ शकाल ज्यात ते त्यांची आवडती जूनी गाणी मनसोक्त ऐकू शकतील.
ग्रूमिंग किट
बहुतेक वडिलांना स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही.आणि यंदा कोरोनामुळे त्यांनी काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे.अशा वेळी यंदा तुम्ही फादर्स डे दिवशी निमित्त त्यांना सेंद्रिय फेस मास्क, स्क्रब इत्यादी गिफ्ट म्हणून देऊ शकता.
कार्ड
बऱ्याचदा आपण आपल्या भावना वडीलांसमोर बोलून दाखवत नाही. किंवा आपल्याला त्या नीट सांगता येत नाही. अशा वेळी ग्रीटिंग कार्ड हा सर्वात बेस्ट पर्याय आहे.एखादे ग्रीटिंग कार्ड घेऊन त्यावर तुमच्या त्यांच्याबद्दलच्या भावना लिहून काढा आणि त्यांना दया. कोणत्याही मोठ्या गिफ्ट पेक्षा त्यांच्यासाठी तुम्ही लिहिलेले दोन शब्द सर्वात जास्त आनंद देतील.