Father’s Day 2020: जाणून घ्या जून महिन्याच्या तिसऱ्या दिवशी का साजरा केला जातो फादर्स डे, दिवसाचे महत्व आणि जगभरात का साजरा केला जातो

जन्मदात्या वडिलांच्याप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यसाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. पण फार थोड्या लोकांना माहित असेल की या दिवसाची सुरूवात कशी, कुठे आणि कोणी सुरू केली. हा दिवस साजरा करण्यामागे सोनोरा लुईस स्मार्ट डॉड या महिलेचा 62 वर्षांचा संघर्ष आहे.

Happy Father's Day 2019 (Photo Credits: Getty)

आई आपल्या बाळाला जगात आणते, तर वडील आपल्या मुलाला जग दाखवतो. त्यामुळे आपल्या जन्मात, जडणघडणींत जेवढा आईचा वाटा असतो तितकीच वडीलही आपल्या मुलांसाठी महत्त्वपुर्ण अशी भूमिका बजावतात. म्हणून दरवर्षी आपण जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (Fathers Day) म्हणून साजरा करतो. जन्मदात्या वडिलांच्याप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यसाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. पण फार थोड्या लोकांना माहित असेल की या दिवसाची सुरूवात कशी, कुठे आणि कोणी सुरू केली. फादर्स डे सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. यामागे रोमांचक कहाणी आहे- सोनेरा डोड (Sonora Dodd) यांची. 'फादर्स डे' हा सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंगटन येथे साजरा करण्यात आला अशी मान्यता आहे. हा दिवस साजरा करण्यामागे सोनोरा लुईस स्मार्ट डॉड या महिलेचा 62 वर्षांचा संघर्ष आहे. (Father's Day 2020 Quotes: आपल्या जीवनात वडिलांचे महत्त्व सांगणारे 10 विचार)

सोनेरा लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडील विलियम स्मार्ट यांनी सोनेरोला कधीच जीवनात आईची कमतरता जाणवू दिली नाही. वडिलांचा प्रेम आणि त्याग बघून एकदिवस सोनेराला वाटेल की एक तरी दिवस केवळ वडिलांच्या नावावर असावा. या प्रकारे फादर्स डे साजरा होऊ लागला. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोराने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती.

जूनच्या तिसऱ्या रविवारी का साजरा केला जातो फादर्स डे?

अमेरिकेत 1909 सिविल वॉरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शिपायाची मुलगी सोनेराने जूनच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्याचा आग्रह केला. कारण याचा दिवशी तिचे वडील देशासाठी लढताना शाहिद झाले होते. आणि 1913 मध्ये अमेरिकी सरकारसमोर 'फादर्स डे' साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व काही वर्षांनी 1972 मध्ये सरकारने जूनचा तिसरा रविवार सुट्टीचा आणि 'फादर्स डे' म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं.

काय आहे या दिवसाचे महत्त्व?

जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जाणारा हा दिवस सुरूवातीला फक्त अमेरिकेत साजरा होत होता. या दिवसाचं महत्त्व पटल्यानंतर भारतातसुद्धा हा दिवस साजरा केला जाऊ लागला. जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या आनंदाने भारतातसुद्धा साजरा केला जातो. जगातील प्रत्येक आईप्रमाणे वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे.

दरम्यान, अमेरिका, भारतमध्ये फादर्स जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो तर पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डे साजरा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif