Father's Day 2019: 'फादर्स डे' कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, परंपरा आणि बरंच काही

हे क्रेडीट अनेकदा आईला मिळते. अर्थात ते मिळायलाही पाहिजे. पण, त्या तूलनेत बाबा मात्र या क्रेडीटपासून काहीसे उपेक्षीतच राहतात. अशा वेळी फादर्स डे साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्याच्या कामाचे कौतुक करणं कोणाला नाही आवडणार?

Happy Father’s Day 2019 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Father's Day History: फादर्स डे (Father's Day 2019) म्हणजेच थेट आपल्या मराठीत सांगायचं तर, पितृदिन. हा दिन साजरा होतोय येत्या 16 जून रोजी. काही लोक या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात. अपवाद वगळता जगातील प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या स्वत:च्या म्हणून यशाच्या मागे खंबीर सूत्रधार म्हणजे प्रत्येकाचे बाबा. पण, आयत्या वेळी होणारा उद्धार वगळता बाबा हा यशाचा पाठीराखा असूनही अनेकदा पडद्यामागचा सूत्रधाराच ठरतो. हे क्रेडीट अनेकदा आईला मिळते. अर्थात ते मिळायलाही पाहिजे. पण, त्या तूलनेत बाबा मात्र या क्रेडीटपासून काहीसे उपेक्षीतच राहतात. अशा वेळी फादर्स डे साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्याच्या कामाचे कौतुक करणं कोणाला नाही आवडणार?

तुम्हाला माहिती आहे फादर्स डे कधी आणि का साजरा केला जातो?

इतिहास आणि घटना:

फादर्स डे साजरा करण्याची तारीख इतर डे किंवा दिवसांप्रमाणे ठरलेली नाही. तर, प्रत्येक वर्षातील जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. गेली अनेक वर्षे ही परंपरा कायम आहे.

घटना क्रमंक एक:

सांगितले जाते की, इसवीसन 20 व्या शतकाच्या सुरुवातीला हा दिवस साजरा करण्याचा प्रघात पडला. अगदीच इतिसाहासत जायचे तर पश्चिम व्हर्जिनियातील फेयरमोंट येथे 5 जुलै 1908 मध्ये पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला, अशा नोंदी सापडतात.

घटना क्रमांक दोन:

सांगितले जाते की, 5 जुलै 1908 च्या काही महिने आगोदर 6 डिसेंबर 2007 मध्ये पश्चिम व्हर्जिनिया येथे असणाऱ्या मोनोंगाह येथील एका खाणीत एक दुर्घटना घडली. यात तब्बल 210 लोक मृत्युमुखी पडले. हे सर्व वडील होते. या 210 वडीलांच्या स्मृतिप्रित्यार्थ श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटन यांनी एका विशेष दिवसाचे आयोजन केले. ज्याला फादर्स डे असे नाव मिळाले.

घटना क्रमांक तीन:

ज्या चर्चमध्ये पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला तो चर्च सेन्ट्रल यूनाइटेड मेथोडिस्ट चर्च नावाने फेयरमोंट येथे आजही उभा आहे. आजही या चर्चमध्ये आपल्या वडिलांप्रती लोक विविध कार्यक्रम आयोजित करतात. एकमेकांना, गरजू लोकांना विविध भेटवस्तू देतात. (हेही वाचा, Father’s Day 2019: जगातील प्रत्येक पित्यासाठी खास असा दिवस, जाणूया घ्या या दिवसाचे महत्व)

फादर्स डे प्रवास आणि स्थित्यांतर

असेही सांगितले जाते की, सर्वात पहिला फादर्स डे 19 जून 1909 राजी साजरा करण्यात आला. वॉशिंगटन येथील स्पोकेन शहरात सोनोरा डॉड याने आपल्या वडिलांप्रती या दिवसाची सुरुवात केली. 1996 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. 1924 मध्ये राष्ट्रपती कॅल्विन कुलीज यांनी या दिवसाचे राष्ट्रीय आयोजन केले. अमेरिकेचे राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी 1966 मध्ये पहिल्यांदा हा दिवस फादर्स डे म्हणून जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा करण्या यावा असा निर्णय घेतला. 1972 मध्ये राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली. तेव्हापासून आज तागायत जून महिन्यातील तिसऱ्या रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.