Father's Day 2019 Gift Ideas: शून्य पैसे खर्च करत या last Minute प्लॅन ने बनवा तुमच्या बाबांचा दिवस खास
आज, 16 जून ला जगभरात फादर्स डेचं जोरदार सेलिब्रेशन चालू असताना अजूनही तुमच्याकडे काही प्लॅन नसेल तर विना खर्चाचा हा लास्ट मिनिट प्लॅन एकदा वापरून बघा
दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे (Fathers Day 2019) निमित्त जोरदार सेलिब्रेशन केलं जात. प्रतिवर्षी प्रमाणे आज देखील प्रत्येक जण आपल्या सोशल मीडियावरून बाबांवर प्रेमाचा भरघोस वर्षाव करत किंवा महागडं गिफ्ट देत ही मॉडर्न सेलिब्रेशनची प्रथा पाळत आहे. काहींकडे मात्र महिन्याचा मध्यवर्ती आठवडा सुरु झाल्याने बजेटचा ठणठण गोपाळा आणि परिणामी गिफ्टच्या आयडियांचा अभाव हेच चित्र दिसत आहे. पण काळजी करू नका कारण "बाबा तुम्हारा दिल देखता है.. बिल नहीं" त्यामुळे यंदा तुमच्या बाबांचा दिवस खास बनवण्यासाठी हा एक शून्य रुपयांचा भन्नाट प्लॅन फॉलो करून बघाच..
#स्टेप क्रमांक १
कोणाच्याही मनाचा मार्ग हा पोट मधून जातो असं म्हणतात, आणि त्यातही जर का तुमचे बाबा फूडी असतील तर तुम्हालाही स्टेप पाळायलाच हवी. तुमच्या बाबांच्या आवडीचा मेनू लक्षात घेऊन जेवणाचा बेत आखा, शक्य असल्यास त्यांना आवडणारे पदार्थ तुमच्या पद्धतीने बनवा. रविवार असल्याने नॉनव्हेज पदार्थ निवडलात तर उत्तम! जेवणाचा बेत वेळकाढू वाटत असल्यास तुमच्या बाबांसाठी काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून बिस्किटाचा केक घरच्या घरी बनवू शकता.
#स्टेप क्रमांक २
बाबांसाठी दुपारच्या वेळेत घरच्याघरी 'मुव्ही टाइम' चे आयोजन करू शकता. तुमच्या बाबांचा आवडता सिनेमा जाणून घ्या आणि शक्य असल्यास त्यांच्यासोबत बसून सिनेमा बघा. उद्या विश्वचषक दौऱ्यातील भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना असल्याने मुव्ही ऐवजी 'मॅच टाइम' हा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता.
#स्टेप क्रमांक ३
बाबांना स्वतःच्या हाताने बनवलेली गिफ्ट्स देऊन देखील तुम्ही खुश करू शकता, यासाठी तुम्हाला सुचलेली एखादी चारोळी किंवा तुमच्या शब्दात तुमचे बाबा असं एखादं पत्र लिहून तुम्ही त्यांना भावनिक आणि मौल्यवान गिफ्ट देऊ शकाल. या पत्रासोबत एखादं छोटंसं रोपटं किंवा गुलाबाचं फुल देखील द्या. तुमच्या बाबांचं एखाद जून टीशर्ट घेऊन त्याच्यावर तुम्ही तुमच्या व त्यांच्या हाताचा ठसा घेऊन एक कुल गिफ्ट देऊ शकता.
#स्टेप क्रमांक ४
रात्री जेवण उरकल्यावर बाबांसोबत बसून गप्पा मारा. Father’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे!
तुमचे बाबा जर का अस्स्ल देसी कुल डॅड असतील तर त्यांना तुमचा हा विनाखर्चिक प्लॅन आवडल्याशिवाय राहणार नाही.