Engineer's Day 2019: जाणून घ्या जगभरात कोणत्या देशात किती तारखेला साजरा करतात अभियंता दिन?
यात अर्जेंटीना, बांगलादेश, बेल्जियम, कोलंबीया, ईराण या देशांसह इतरही विविध देशांचा समावेश आहे. म्हणूनच जाऊन घेऊया भारताशिवाय इतर देशांमध्ये कोणत्या तारखेला साजरा होतो अभियंता दिन.
Engineer's Day 2019: भारतामध्ये 15 सप्टेंबर या तारखेला अभियंता दिन साजरा केला जातो. जगभरामध्ये विविध दिन साजरे करणे ही तशी नित्याची बाब. पण, यात एक समान धागा असा की, जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिनांमध्ये एकादा दिवस अथवा तारीख ठरलेली असते. परंतू, अभियंता दिनाबाबत हा नियम लागू पडत नाही. जगभरातील विविध देश अभियंता दिन वेगवेगळ्या तारखेला साजरा करतात. यात अर्जेंटीना, बांगलादेश, बेल्जियम, कोलंबीया, ईराण या देशांसह इतरही विविध देशांचा समावेश आहे. म्हणूनच जाऊन घेऊया भारताशिवाय इतर देशांमध्ये कोणत्या तारखेला साजरा होतो अभियंता दिन.
भारतात 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो अभियंता दिन?
जगप्रसिद्ध अभियंता मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 15 सप्टेंबर हा विश्वैरैया यांचा जन्मदिन. विश्वैश्वरया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या गौरवासाठीच भारत सरकारने 15 या तारखेस अभियंता दिन साजरा करण्याचे ठरवले. भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
जगभरात कोणत्या देशात किती तारखेला साजरा करतात अभियंता दिन?
कोणत्या देशात कधी साजरा होतो अभियंता दिन |
|
देशाचे नाव |
अभियंता दिन साजरा करण्याची तारीख |
अर्जेंटीना | 16 जून |
बांगलादेश | 7 मे |
बेल्जियम | 20 मार्च |
कोलंबिया | 17 ऑगस्ट |
आइसलँड | 10 एप्रिल |
ईराण | 24 फेब्रुवारी |
इटली | 15 जून |
मैक्सिको | 1 जुलै |
पेरू | 8 जून |
रोमानिया | 14 सप्टेंबर |
तुर्की | 5 डिसेंबर |
सर मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांच्याबद्दल थोडक्यात
सर मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्म कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. मोक्षगुंडम यांच्या वडीलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. विश्वैश्वरया यांनी आपले प्रारंभीक शिक्षण आपल्या जन्मगावी तर, पुढील शिक्षण बेंगलुरु येथील सेंट्रल काँलेज येथे घेतले. 1881 मध्ये मोक्षगुंडम विश्वैश्वरया हे बीए परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मैसूर सरकारने उचलली. त्यांनी पुणे येथील सायन्स कॉलेजमधून अभियात्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले.
विश्वैश्वरया यांनी उभारलेले काही प्रकल्प
स्वतंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वैश्वरया यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भागीरत म्हणूनही ओळखले जाते.