Eid ul-Fitr Messages In Marathi: रमजान ईद निमित्त Wishes, Quotes, Images द्वारा शुभेच्छा देऊन साजरा ईद उल-फितर चा सण
Eid ul-Fitr Messages In Marathi: ईद उल फितर (Eid-ul-Fitr) म्हणजे पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवशी मागील महिन्याभरापासून केलेल्या रमजान महिन्यातील उपवासांची सांगता केली जाते. ईस्लामिक कॅलेंडर नुसार, या दिवसापासून शव्वाल(Shawwal) महिन्याची सुरूवात केली जाते. हा ईदचा दिवस मीठी ईद म्हणून देखील ओळखली जाते. महाराष्ट्रासह भारतामध्ये अनेक ठिकाणी ही ईद 14 मे दिवशी साजरी केली जाणार आहे. मग या ईद उल फितर च्या शुभेच्छा यंदा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सोशल मीडीयात Facebook, WhatsApp, Twitter, Instagram वर HD Images, Wishes, Messages, WhatsApp Status, Stickers, GIFs आणि शायरीच्या माध्यमातून शेअर करून आनंद द्विगुणित करा. (नक्की वाचा: Chaand Raat Mubarak 2021 Wishes: चांद रात मुबारक Messages, Images आज WhatsApp, Facebook वर शेअर करत Eid ul-Fitr ची पूर्वसंध्या करा साजरी!).
मुस्लिम बांधव हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशीच्या नमाजामध्ये अल्लाह कडून प्रार्थना करून सुख, समृद्धी आणि शांती ची कामना केली जाते. यंदादेखील कोरोना वायरसच्या संकटामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींपासून थोडं अंतर ठेवूनच आणि अत्यंत साधेपणाने हा सण साजरा करावा लागणार आहे. पण हे अंतर व्हर्च्युअली भरून काढण्यासाठी ही शुभेच्छापत्र आज नक्की त्यांच्यासोबत शेअर करा.
ईद उल फितर च्या शुभेच्छा
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक
ईद उल-फ़ित्रच्या हार्दिक शुभेच्छा!
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
रमजान ईद मुबारक तुम्हा सर्वांस!
रमजान ईद मुबारक
ईद उल फितर चा दिवस हा मीठी ईद म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवशी मुस्लिम बांधव घराघरामध्ये खीर कुर्माचा बेत करतात. एकमेकांना भेटवस्तू देऊन हा आनंदोत्सव साजरी कारतात. यादिवशी विशेष नमाज पठण देखील एकत्र येऊन केलं जातं. पण यंदा सार्यावरच सामुहिक सेलिब्रेशन वर बंदी आहे.