Eid-ul-Adha 2024: देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे आयोजन (Watch Videos)
मुंबई, दिल्ली, नोएडा, भोपाळ राज्यात अनेक ठिकाणी आज बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुस्लिम बांधव नमाज अदा करताना दिसत आहेत. मोठ्यांसह मुलान मुले एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेट करत आहेत.
- Read in
- मराठी
Eid-ul-Adha 2024: देशभरात आज सर्वत्र मुस्लिम बांधवानी बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अधा (Eid-ul-Adha 2023) साजरी करत आहेत. विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केलं. ईद-अल-अधा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्याच्या धुल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी येते. ईद-उल-अधाच्या निमित्ताने, दिल्लीत हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय जामा मशिदीत नमाज अदा करताना दिसला. तर मुंबईत माहीममधील मखदूम अली माहिमी मशिदीत ईद-उल-अधा निमित्त नमाज अदा करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुले जामा मशिदीत ईद-उल-अधाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. ईद-अल-अधा ला मुस्लिम समुदायाच्या नागरिकांमध्ये महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
व्हिडीओ पाहा-
#WATCH | Delhi: Devotees offer Namaz at the Jama Masjid on the occasion of Eid Al Adha festival. pic.twitter.com/OnufmNVisx
— ANI (@ANI) June 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2024 11:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

