Eid-e-Milad un Nabi 2020 HD Images: मुस्लीम बांधवांना SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Greetings, Messages च्या माध्यमातून द्या ईद-ए-मिलाद उन नबी च्या शुभेच्छा
हा दिवस ईद मिलाद उन-नबी (Eid-e-Milad-un-Nabi 2020) किंवा ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावाने देखील ओळखला जातो. यंदा ईद-ए-मिलाद 29 आणि 30 ऑक्टोबर 2020 मध्ये साजरा केला जाईल. इस्लामिक कॅलेंडरनुसार तिसर्या महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो.
पैगंबर हजरत मोहम्मद साहेब (Prophet Muhammad) यांचा जन्मदिन जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस ईद-ए-मिलाद उन-नबी (Eid-e-Milad-un-Nabi 2020) किंवा ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावाने देखील ओळखला जातो. यंदा ईद-ए-मिलाद 29 आणि 30 ऑक्टोबर 2020 मध्ये साजरा केला जाईल. इस्लामिक कॅलेंडरनुसार तिसर्या महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. सूफी किंवा बरेलवी मुस्लिम अनुयायी हा दिवस खूप खास मानतात. इस्लामिक मान्यतेनुसार पैगंबर साहेबांचा जन्म इस्लामचा तिसरा महिना म्हणजेच रबी-अल-अव्वलच्या 12 वि तारीख 573 ई मध्ये झाला होता.
इस्लामिक चंद्र कॅलेंडरनुसार, भारतात रबी-अल-अव्वल महिना 19 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. तर ईद मिलाद उन-नबी 30 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी ईद मिलाद उन नबीच्या खास मेजवानीचे आयोजन केले जाते. यासह मोहम्मद यांच्या स्मरणार्थ मिरवणुका काढल्या जातात. मात्र यावर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे मोठी मिरवणूक किंवा समारंभ आयोजित करण्याची शक्यता फारच कमी आहे.
तर या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Greetings, Messages, HD Images च्या माध्यमातून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देऊ शकता.
ईद-ए-मिलाद 29 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होईल आणि 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्याचा समारोप होईल. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि उपखंडातील इतर भागांमध्ये याच दिवशी ईद साजरी केली जाईल. सौदी अरेबियामध्ये हा उत्सव 29 ऑक्टोबरला साजरा होईल. (हेही वाचा: Eid-e-Milad un Nabi 2020 Mehndi Designs: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने पाहूयात काही सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन)
दरम्यान, मक्का येथे जन्मलेल्या पैगंबर मोहम्मद साहेब यांचे पूर्ण नाव मोहम्मद इब्न अब्दुल्ला इब्न अब्दु मत्तलिब होते. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव अमीना बीबी होते. असे म्हणतात की ई 610 मध्ये हजरत साहेब यांना मक्कामधील मीरा नावाच्या गुहेत ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतरच त्यांनी इस्लाम धर्मातील पवित्र कुराणचा उपदेश केला.