Happy Bakrid Mubarak Wishes: 'बकरी ईद'च्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना खास Greetings, Messages, WhatsApp Status शेअर करून द्या 'ईद-उल-अजहा'च्या शुभेच्छा

Happy Bakrid Mubarak Wishes: ईद-उल-अजहा (Eid al-Adha) म्हणजे बकरीद (Bakri Eid 2021) हा इस्लाम धर्मियांचा एक महत्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीदचा सण 12 व्या महिन्याच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर साधारण 70 दिवसांनी साजरा केला जातो.

Happy Bakrid Mubarak Wishes: 'बकरी ईद'च्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना खास Greetings, Messages, WhatsApp Status शेअर करून द्या 'ईद-उल-अजहा'च्या शुभेच्छा
Eid al-Adha Mubarak Wishes 2021 (File Image)

Bakrid Mubarak Wishes in Marathi: ईद-उल-अजहा (Eid al-Adha) म्हणजे बकरीद (Bakri Eid 2021) हा इस्लाम धर्मियांचा एक महत्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीदचा सण 12 व्या महिन्याच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर साधारण 70 दिवसांनी साजरा केला जातो. इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम याच दिवशी परमेश्वराच्या आदेशानुसार आपला मुलगा हजरत इस्माईलचे देवाच्या मार्गावर बलिदान देणार होते, त्यानंतर अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. हा उत्सव याच्याच स्मरणार्थ साजरा केला जातो. यावेळी बकरीद 21 जुलै रोजी साजरी केली जाईल.

या दिवशी प्राण्यांचा बळी दिला जातो. इस्लाममध्ये हा बलिदानाचा सण बकरी ईदच्या दिवशी प्रथम मशिदींमध्ये नमाज अदा करू सुरु केला जातो. यानंतर बकरीचा बळी दिला जातो. हे मांस तीन भागात विभागले जाते, यापैकी एक भाग गरिबांना तर दुसरा भाग मित्र व नातेवाईकांना दिला जातो. तिसरा भाग घरातील सदस्यांसाठी ठेवला जातो. तर या सणानिमित्त मुस्लीम बांधवांसोबत खास Wishes, WhatsApp Staus, Messages, Greetings शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.

Eid al-Adha Mubarak Wishes 2021
Eid al-Adha Mubarak Wishes 2021
Eid al-Adha Mubarak Wishes 2021
Eid al-Adha Mubarak Wishes 2021
Eid al-Adha Mubarak Wishes 2021
Eid al-Adha Mubarak Wishes 2021

दरम्यान, असे सांगितले जाते की, जेव्हा हजरत इब्राहिम अल्लाहची उपासना करीत होते तेव्हा खुदा त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि त्याने इब्राहीम यांची प्रार्थना मान्य केली. नंतर अल्लाहने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. या चाचणीत अल्लाहने इब्राहिम यांना त्यांच्या सर्वात मौल्यवान आणि प्रिय वस्तूचा त्याग करण्यास सांगितले. (हेही वाचा: Eid al-Adha 2021 Shayari in Urdu and Hindi)

हजरत इब्राहिम यांनी अल्लाहची आज्ञा पाळत आपली सर्वात प्रिय वस्तू म्हणजे आपला मुलगा इस्माईलचा बळी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर, जेव्हा हजरत इब्राहिम आपल्या मुलाचा बळी देणार होते, तेव्हा अल्लाहने मुलाच्या जागी बकरी ठेवली व त्यानंतर इब्राहिम परीक्षेत सफल झाले. तेव्हापासून हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2021 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).