Eid al-Adha 2021 Shayari in Urdu and Hindi: बकरी ईद निमित्त शुभेच्छा पाठवण्यासाठी खास Eid Mubarak HD Images, Quotes, Greetings, Wishes and Wallpapers
या दिवशी बकरयाचा बळी दिला जातो.
बकरी ईद 2021 इस्लामिक किंवा चंद्र दिनदर्शिकेच्या 12 व्या महिन्यात धु अल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी साजरा केला जाणारा एक इस्लामिक उत्सव आहे. ईद-उल-अधा 2021 किंवा ईद कुरबान किंवा कुरबान बायारामी म्हणून देखील ओळखला जातो, ईद-अल-फितर (मीठी ईद) नंतरचा मुस्लिमांचा दुसरा सर्वात महत्वाचा सण आहे.ईद-उल-फितर हा रमजानच्या पवित्र महिन्याचे अंत चे प्रतिक आहे, तर बकरी ईद वार्षिक हज यात्रेचा शेवट आहे. यावर्षी हा शुभ सण 21 जुलै 2021 रोजी भारतात साजरा केला जाईल.मुस्लीम समाजातील पुरुष, महिला आणि मुले मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. या दिवशी बकरयाचा बळी दिला जातो आणि त्याला तीन भागात विभागले जाते.या दिवशी नवीन कपडे घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम पदार्थ बनवले जातात.(Bakri Eid 2021 Mehandi Designs: बकरी ईद च्या खास दिवसासाठी हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन)
यंदाही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घरामध्ये राहणे ही एक नवीन सामान्य गोष्ट आहे, म्हणूनच कॉल आणि मेसेजद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे संपर्कात राहणे खूप महत्वाचे आहे.म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास Best Eid Mubarak HD Images, Quotes, Greetings, Wishes and Wallpapers जे तुम्ही मित्रपरिवाराला पाठवू शकता.
इस्लामिक कॅलेंडरनुसार हा सण ईद-उल-अजहा या नावानेही ओळखला जातो. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बकऱ्याचा बळी दिला जातो.