Earth Hour 2022: अर्थ अव्हर काय असतो? जाणून घ्या त्याचं महत्त्व आणि त्या संबंधित 7 इंटरेस्टिंग गोष्टी

World Wide Fund for Nature कडून जगभरात अर्थ अव्हर पाळला जातो.

Happy Earth Hour (Photo Credits: Pixabay)

जगभरात 26 मार्च या दिवशी रात्री तासभर Earth Hour पाळला जातो. या निमित्ताने सामान्य नागरिक, व्यावसायिक, प्रशासकीय पातळीवर अनावश्यक वापरातली वीज तासभर खंडीत केली जाते. यामुळे पृथ्वीवरील थोडा भार कमी करण्यासाठी हातभार लावला जातो. World Wide Fund for Nature (WWF) कडून हा 'अर्थ अव्हर' चा प्रयत्न पुढे आला आहे. दरवर्षी रात्री 8.30 ते 9.30 या तासाभरासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लाईट्स बंद केले जातात. 2007साली ऑस्ट्रेलियाच्या सिडनी मधून लाईट्स ऑफ इव्हेंटला सुरूवात झाली. BSES ने त्यांच्या ग्राहकांना आणि शहरातील नागरिकांना लाईट्स ऑफचं आवाहन केले होते. नक्की वाचा: विजेचे बिल कमी करण्यासाठी खास '7' ट्रिक्स !

Earth Hour बद्दल इंटरेस्टिंग गोष्टी

1. 2018 मध्ये Earth Hour हा जगात सर्वात विक्रमी 188 देश आणि प्रांतात पाळला गेला. 17900 लॅन्डमार्क्सचा त्यामध्ये समावेश होता. तासाभरासाठी मिलियंस लोकांनी लाईट्स बंद ठेवले होते. 33 देशांमध्ये ट्वीटरवर या दिवशी #EarthHour आणि #Connect2Earth ट्रेंड झालं होतं.

2. जगातील प्रसिद्ध लॅन्डमार्क्स आयफेल टॉवर (पॅरिस), सिडनीचं ऑपेरा हाऊस, द एम्पायर स्टेट बिल्डिंग, द ग्रेट पिरॅमिड्स, बुर्ज खलिफा यांनीही Earth Hourमध्ये सहभाग घेतला होता.

3. 2013 मध्ये युगांडा च्या WWF branch ने जंगलतोडीचं वाढतं प्रमाण पाहता world’s first Earth Hour Forest पाळला होता. तेव्हापासून, चॅरिटीने 2700 हेक्टरपेक्षा जास्त जमीन संरक्षित केली आहे आणि ती 500,000 झाडांनी पुन्हा हिरवी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

4. स्पायडर मॅन हा पहिला सुपर हिरो आहे जो 2014 साली जागतिक पातळीवर Earth Hour चा राजदूत बनला. यामुळे जागतिक स्तरावर लोकांचे लक्ष या विषयाकडे वळले.

5. 2020 मध्ये Earth hour पहिल्यांदा युके मध्ये डिजिटल झाले. लाईट्स बंद करण्यासोबत अनेकांनी तासाभरात डिजिटल इव्हेंट आणि लाइव्ह स्ट्रीममध्ये सामील होऊन ऑनलाइन कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न केला.

6. 2021 मध्ये, WWF ने प्रथमच ‘Earth Hour Virtual Spotlight’ ला प्रोत्साहन दिले. Earth Hour च्या सोशल मीडिया चॅनेलवर पोस्ट केलेला चित्रपट जास्तीत जास्त लोकांना शेअर करणे हा यामागचा उद्देश होता.

7. 2020 मध्ये, फिलिपिन्सने Earth Hour दरम्यान त्यांचा वीज वापर 611MWh ने कमी केला.

2022  चा अर्थ अव्हर "Shape Our Future."या थीमवर साजरा केला जाणार आहे. हे प्रत्येकासाठी आणि आपल्या जगासाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष आहे. आज आपल्या जगावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करून #ShapeOurFuture हे आपल्यावर अवलंबून आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now