Earth Day 2021 Google Doodle: गुगलने खास डूडलच्या साहाय्याने दिल्या 'अर्थ डे 2021' च्या शुभेच्छा; उज्ज्वल भविष्यासाठी लोकांना झाडे लावण्यास केले प्रोत्साहित

पृथ्वी दिवस नैसर्गिक संपत्ती वाचवणे आणि निसर्गाला सुरक्षित ठेवणे यासाठी जनजागृती करतो.

World Earth Day 2021 (Photo Credits: Google)

दरवर्षी 22 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच ‘अर्थ डे’ (Earth Day 2021) साजरा केला जातो. लोकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिवस साजरा करण्यात आला होता. 1969 मध्ये ज्युलियन कोनिग यांनी या दिवसाचे नाव ठेवले होते. अशाप्रकारे यंदा लोकांसोबत गूगलदेखील आपल्या डुडलसोबत (Google Doodle) खास पद्धतीने या दिवसाचे सेलिब्रेशन करीत आहे. यावर्षीच्या अर्थ डेच्या डूडलमध्ये हायलाइट केले गेले आहे की, आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे-एका वेळी एक रोपटे!

या डूडलसोबत गुगलने म्हटले आहे, 'आपण ज्याला घर असे संबोधतो ती ही पृथ्वी आपल्या जीवनाचे पोषण करते. आपले पर्यावरण आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. मात्र त्याबदल्यात आपणही त्याचे काही देणे लागतो. आजच्या व्हिडिओ डूडलमध्ये नैसर्गिक निवासस्थानामध्ये विविध प्रकारची झाडे लावल्याचे दर्शविले आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आपली पृथ्वी चांगली आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी आपण असे अनेक प्रयत्न करू शकतो.’

पुढे म्हटले आहे. ‘या पृथ्वी दिनादिवशी आणि दररोज- आम्ही, आपली पृथ्वी पुनर्संचयित करण्यासाठी आपण करू शकणारी एक लहान कृती शोधण्यासाठी प्रत्येकास प्रोत्साहित करतो. एखादे बी पेरून त्याचे एका सुंदर गोष्टीमध्ये बहरणे यासाठी प्रयत्न करायला हवेत.’

पृथ्वी दिनाचे महत्त्व यासाठी महत्वाचे आहे कारण, या दिवशी, पर्यावरणवाद्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्लोबल वार्मिंगचा वातावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती मिळते. पृथ्वी दिवस नैसर्गिक संपत्ती वाचवणे आणि निसर्गाला सुरक्षित ठेवणे यासाठी जनजागृती करतो. तसेच, लोकसंख्येच्या वाढीमुळे नैसर्गिक संसाधनांवर अनावश्यक ओझे पडले आहे, तेव्हा संसाधनांचा योग्य वापर करा अशी शिकवणही पृथ्वी दिनाच्या माध्यमातून दिली जाते. (हेही वाचा: Betel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे)

दरम्यान, 2007 चा पृथ्वी दिवस हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थ डे होता. ज्यामध्ये कीव, युक्रेन, कराकस, व्हेनेझुएला, तुवालु, मनिला, फिलीपिन्स, माद्रिद, स्पेन, लंडन, न्यूयॉर्क अशा अंदाजे हजारो स्थानांवरील लाखो लोकांनी सहभाग नोंदविला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif