Durga Puja 2019: मुंबई मध्ये 'दुर्गा पूजा' सणाचा आनंद लुटायचा असेल तर बंगाल क्लब शिवाजी पार्क ते रामकृष्ण मिशन मठ या 5 मंडळांना नक्की भेट द्या!
महाराष्ट्रात नऊ रात्री आणि दहा दिवसांचा नवरात्रीचा सण असला तरीही बंगाली लोकांमध्ये या सणाची खरी रंगत षष्ठीपासून येण्यास सुरूवात होते. त्यामुळे यंदा 3 ऑक्टोबर पासून मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park), वाशी (Vashi) , विलेपार्ले, खार(Khar) परिसरात तुम्हांला बंगाल क्लबच्या दुर्गा पूजा उत्सवात नक्की सहभागी व्हा.
Durga Puja Celebrations In Mumbai: महाराष्ट्रामध्ये नवरात्रीची (Navratri) सुरूवात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होत असली तरीही पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीमध्ये दुर्गा पूजेचा खास उत्सव असतो. नवरात्रीमधील षष्ठी ते नवमी तिथी दिवशी दुर्गा पूजा (Durga Puja) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मुंबईमध्येही काही बंगाल क्लबमध्ये मोठया धामधुमीत हा सण साजरा केला जातो. सुष्मिता सेन, काजोल यांच्यासारख्या सेलिब्रिटींसह सामान्य लोकही दुर्गा पूजेसाठी एकत्र येतात. सिंधुर खेला (Sindur Khela), धुनुची नृत्य (Dhunuchi Dance) यांच्यासोबत पारंपारिक बंगाली खाद्यपदार्थांवर ताव मारायचा असेल तर मुंबईमध्ये आयोजित दुर्गा पूजा पंडालमध्ये यंदा नक्की भेट द्या. महाराष्ट्रात नऊ रात्री आणि दहा दिवसांचा नवरात्रीचा सण असला तरीही बंगाली लोकांमध्ये या सणाची खरी रंगत षष्ठीपासून येण्यास सुरूवात होते. त्यामुळे यंदा 3 ऑक्टोबर पासून मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park), वाशी (Vashi) , विलेपार्ले, खार(Khar) परिसरात तुम्हांला बंगाल क्लबच्या विविध मंडळांमध्ये नक्की भेट द्या. Durga Puja 2019: दुर्गा पूजा का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्व
मुंबईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात साजरी होते दुर्गा पूजा?
1. बंगाल क्लब, शिवाजी पार्क (दादर)
View this post on Instagram
Bengal Club Durga Puja Invite @bengalclub_shivajipark #maaaschen #celebration #culturalfestival
A post shared by Bengal Club Shivaji Park (@bengalclub_shivajipark) on
यंदा शिवाजी पार्क मधील बंगाल क्लब आयोजित दुर्गा पूजेचे 84 वे वर्ष आहे. सेलिब्रिटींपासून सामान्य या मंडळाच्या दुर्गात्सवात दरवर्षी सहभागी होतात. षष्ठीच्या संध्याकाळी दुर्गा पूजेला सुरूवात होते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पारंपारिक बंगाली खाद्यपदार्थांची चव चाखू शकता, सोबतच शॉपिंगचाही आनंद लुटू शकता.
कुठे आहे ? शिवाजी पार्क, महापौर बंगल्यासमोर -दादर
2. बॉम्बे दुर्गा बरी समिती ( ग्रॅन्ट रोड)
बॉम्बे दुर्गा बरी समिती ही मुंबईत दुर्गापूजेचे आयोजन करणारी सगळ्यात जुन्या समितींपैकी एक आहे. यंदा या समितीचे 89 वे वर्ष आहे. यंदा 7 ऑक्टोबरला कुमारिका पूजन, धुनुची नृत्य असे पारंपारिक कार्यक्रम देखील रंगणार आहेत.
कुठे आहे ? तेजपाल हॉल अॅन्ड ऑडिटेरियम ग्रॅन्ट रोड
3.रामकृष्ण मिशन (खार)
मुंबईत पारंपारिक पद्धतीने दुर्गापूजा साजरी करण्यासाठी रामकृष्ण मठातील दुर्गापूजा लोकप्रिय आहे. येथे कुमारी पूजनही केले जाते. स्वामी विवेकानंदांनी कुमारिका पुजनाची प्रथा सुरू केली.
कुठे आहे ? रामकृष्ण मिशन मार्ग,12 वा रस्ता खार पश्चिम
4. चेंबूर दुर्गा पूजा असोसिएशन
View this post on Instagram
Pujo Shuchi'19 . . . #cdpa #chemburdurgotsav #durgapuja #allthingsbengali
A post shared by CDPA (@chemburdurgotsav) on
4 ऑक्टोबर, शुक्रवार पासून चेंबूर दुर्गा पूजा असोसिएशनच्या दुर्गापूजेला सुरूवात होणार आहे. दरवर्षी 2 लाखाहून अधिक लोकं या मंडळाला भेट देतात. पारंपारिक भोग, अस्सल पारंपारिक पदार्थांची लयलूट असते.
कुठे आहे ? चेंबूर हायस्कूल ग्राऊंड, स्वामी विवेकानंद चौक, चेंबूर पूर्व
5. नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा
नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा या मंडळाला अनेक सेलिब्रिटींचीही हमखास हजेरी असते. 1947 साली पद्मश्री शासधर मुखर्जींनी 26 मित्रमंडळींसोबता एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली.मुंबईतील ही सर्वात मोठी इको फ्रेंडली मूर्ती आहे.
कुठे आहे ? गोल्डन टोबॅको ग्राऊंड, टोबॅको हाऊस, इंदिरा नगर, एस.व्ही रोड, विलेपार्ले
धुनुची नृत्यप्रकार हा एक शक्ती नृत्य प्रकार आहे. त्प बंगालच्या परंपरेचा हिस्सा आहे. देवी समोर शक्ती आणि उर्जा यांचं प्रतिक म्हणून हा नृत्य प्रकार केला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)