Dry Day Today In Maharashtra: गांधी जयंती निमित्त आज महाराष्ट्रात ड्राय डे!
महाराष्ट्रात (Maharashtra) आज 2 ऑक्टोबर दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
भारतामध्ये आज 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती (Gandhi Jayanti) म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी महात्मा गांधींना आदरांजली म्हणून संयुक्त राष्ट्रानेही गांधीजींचा जन्मदिवस हा 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. भारतामध्ये महत्त्वाच्या राष्ट्रीय सण, धार्मिक समारंभाच्या दिवशी ड्राय डे (Dry Day) घोषित केला जातो. त्यादिवशी मद्य विक्रीवर बंदी असते. महाराष्ट्रात (Maharashtra) आज 2 ऑक्टोबर दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान ड्राय डे घोषित केल्यानंतर त्याचे उल्लंघन करणार्यांवर देखील कठोर कारवाई केली जाते. उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांना दंड आकारला जातो. licensed shop owners ला नियमांचं उल्लंघन केल्यास कोणतीही भरपाई दिली जात नाही. हा आदेश परवान्याची पूर्तता करणाऱ्या हॉटेलमधील अल्कोहोलच्या सेवनावर लागू होत नाही परंतु केवळ अल्कोहोलच्या किरकोळ विक्रीवर बंदी असते.
महाराष्ट्रात आज 2 ऑक्टोबर नंतर 8 ऑक्टोबरला दारूबंदी सप्ताह पाळला जाणार असल्याने ड्राय डे आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबरला दसरा आणि 17 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त ड्राय डे पाळला जाणार आहे. नक्की वाचा: Gandhi Jayanti 2024 HD Images: गांधी जयंतीच्या शुभेच्छा शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, Photos.
गांधी जयंती
भारताचा स्वातंत्र्यलढा 'अहिंसे'च्या मार्गाने उभा करून तो यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर मोहनदास करमचंद गांधी यांना लोक प्रेमाने 'बापू', 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधू लागले. त्यांनी आयुष्यभर सत्य, अहिंसा ही जीवनमूल्य जपली आणि जगाला त्याच्यामधून प्रेरणा घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आजही त्यांच्या या जीवनमूल्यांनी प्रेरणा घेऊन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला जातो. गुजरातच्या पोरबंदर मध्ये जन्मलेल्या महात्मा गांधींनी बॅरिस्टर चे शिक्षण घेतले होते. परदेशी शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात येऊन त्यांनी देशसेवेला स्वतःला अर्पण केले होते.