Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Messages: आंबेडकर जयंती निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून द्या भीम जयंतीच्या शुभेच्छा!
मग त्यात आंबेडकर जयंती अपवाद कशी ठरेल. मग यंदाही आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, मराठी संदेश, ग्रिटींग्स, इमेजेस...
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबांची ही 129 वी जयंती आहे. दलितांसाठी दैवत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन, कार्य, विचार पुढील पीढीसाठी प्रेरणादायी आहेत. या थोर युगपुरुषाचे विचार, कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचावे म्हणून भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेक सोहळे, कार्यक्रम, रद्द झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात भीम जयंतीचा सोहळा साजरा करता येणार नाही. परंतु, लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ आंबेडकरांवरील पुस्तक वाचून सत्कारणी लावू शकतो. तसंच बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे मंथन करुया. त्यांच्यातील कोणता गुण आपण अंगिकारु शकतो, ते पाहुया. त्यांचे विचार आत्मसात करुया. आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेबांना दिलेली हीच मोठी आदरांजली असेल. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings शेअर करून साजरी करा यंदा भीम जयंती!)
आजकाल आपण सर्वच सण सभारंभ यांच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून देत असतो. मग त्यात आंबेडकर जयंती अपवाद कशी ठरेल? यंदाही आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, मराठी संदेश, ग्रिटींग्स, इमेजेस...
भीम जयंती शुभेच्छा:
सागराचे पाणी कधी आटणार नाही
बाबांची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी,
नाद भिम जयंतीचा सुटणार नाही.
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करुन दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरुन दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते.
पण माझ्या भिमाने तर
पाण्यालाच आग लावली..
जम भीम!
उद्धारली कोटी कुळे
भिमा तुझ्या जन्मामुळे
आंबेडकर जयंती निमित्त महामानवास कोटी कोटी प्रणाम!
नमन तया देशप्रेमाला
नमन तया सागराला,
नमन तया ज्ञान देवतेला
नमन तया महापुरुषाला..
जम भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Ambedkar Jayanti Stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
आंबडेकर जयंती निमित्त आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम, मुंबईच्या चैत्यभूमीवर होणारी भाविकांची गर्दी या साऱ्यावर कोरोनाच्या संकटामुळे पाणी फिरलं आहे. मात्र हे संदेश, शुभेच्छापत्रं शेअर करुन आंबेडकर जयंती उत्साह आपण नक्कीच टिकवू शकतो.