DIY Rakhi Ideas: रक्षाबंधन दिवशी भावासाठी घरातच कशी बनवाल राखी? Watch Video
ज्या नशीबवान घरात बहीण-भाऊ एकत्र राहत आहेत ते मात्र आनंदात, उत्साहात हा सण साजरा करताना यंदा थोडी क्रिएटीव्हीटी देखील वापरू शकतील.
श्रावण महिन्यात बहिण-भावाच्या नात्यामधील बंध अधिक दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). यंदा रक्षाबंधन 22 ऑगस्टला आहे. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या हाता वर प्रेमाचा धागा राखीच्या स्वरूपात बांधते. या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्याची कामना करताना आजन्म बहीणीचं रक्षण करण्यासाठी वचन घेते. यंदादेखील या सणावर कोविडचं सावट आहे. कोरोनाच्या भीतीमुळे तुम्ही यंदा राख्या विकत घेण्यासाठी बाहेर पडू शकत नसलात किंवा तुमची क्रिएटीव्हीटी वापरून तुम्हांला भावासाठी घरीच राखी बनवायची असेल तर पहा तुम्ही नाजूक साजूक पण तरीही खास राख्या कशा बनवू शकाल? (नक्की वाचा: Raksha Bandhan 2021 Date: 22 ऑगस्ट रोजी साजरा केले जाईल रक्षाबंधन , जाणून घ्या राखी बांधण्याची शुभ वेळ).
भावासाठी बाजारात नेमकी एक राखी शोधणं कठीण असतं मग तुमच्या भावाची आवड आणि तुमची क्रिएटीव्हीटी वापरून नेमकी सुंदर बनवायची कशी? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी या काही DIY Rakhi Ideas नक्की पहा.
मऊसूत लोकराची राखी
लोकरीच्या उबेमध्ये जेव्हा माया आणि प्रेम असते तेव्हा ती राखी तुमचं नातं अधिकच घट्ट करेल.
सिल्कच्या धाग्याची राखी
फ्रेंडशीप डे नुकताच पार पडला आहे. या निमित्ताने अनेकांनी सिल्क फ्रेंडशीप बॅन्ड्स बांधले असतील आता याच सिल्क धाग्यांना ट्वीस्ट देत राख्या बनवून बघा.
नक्षीदार राख्या
काही मोती, डायमंड्स किंवा बॅचेस वापरूनही तुम्ही राखी बनवू शकता.
टाकाऊपासून टिकाऊ
टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून असंख्य राख्या बनवल्या जाऊ शकतात.
क्विलिंग राखी
क्विलिंग हे सध्या ट्रेडिंग आर्ट आहे. क्विलिंग़ करून देखी तुमच्या भावाला तुम्ही सुरेख राखी बनवू शकता.
यंदाच्या वर्षी देखील अनेक घराघरात रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने सारी कुटुंबं, बहीण-भाऊ पूर्वीप्रमाणे एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा अनेक घरात व्हर्च्युअल पद्धतीनेच रक्षाबंधन साजरा होईल. पण ज्या नशीबवान घरात बहीण-भाऊ एकत्र राहत आहेत ते मात्र आनंदात, उत्साहात हा सण साजरा करताना यंदा थोडी क्रिएटीव्हीटी देखील वापरू शकतील.