Diwali Padwa Special Rangoli Designs: चमचा, कंगवा अशा घरगुती वस्तूंचा वापर करून काढा हटके रांगोळी; पहा सोप्प्या स्टेप्स (Watch Video)
Rangoli Designs By Using Home Tools (Photo Credits: Youtube)

Rangoli Designs 2019: दिवाळी (Diwali) म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि बरंच काही.. यंदा 25 ऑक्टोबर पासून सुरु झालेला हा सण दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा (Balipratipada)म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padwa) निमित्ताने देखील सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. आता दिवाळीची सजावट म्हंटली तर रांगोळीला (Rangoli) तर खास महत्व आहे. पण दरवर्षी त्याच ठिपक्यांच्या, संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढून तुम्हीही कंटाळला आहात का? तर काळजी करू नका यंदा दिवाळीच्या रांगोळीत तुम्ही काही सोप्प्या पण आकर्षक ट्रिक्स वापरून एक हटके डिझाईन काढू शकता, यासाठी तुम्हाला ना कोणत्या गॅजेट्स ची गरज लागेल ना क्लिष्ट डिझाईन ट्युटोरियल व्हिडीओजची. तुमच्या घरातील कंगवा, चमचा अशा सध्या गोष्टी वापरून तुम्ही एक सुंदर रांगोळी साकारू शकणार आहात.

काय मग वाट कसली बघताय, तुमच्यातील आर्टिस्ट ला जागे करत अशी सजवा तुमची दिवाळी पाडवा विशेष रांगोळी..

काट्याचा वापर करून रांगोळी 

Diwali Padwa Muhurt 2019: दिवाळी पाडवा निमित्त 'या' मुहूर्तावर करा पतीची ओवाळणी; 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

कॉटन बड्स चा वापर करून रांगोळी 

चमच्यांचा वापर करून रांगोळी 

बांगड्यांचा वापर करून रांगोळी 

 कंगव्याचा वापर करून रांगोळी

रांगोळी ही एक सजावटीपुरती गोष्ट नसून त्यामागे अनेक धार्मिक अर्थ देखील लपले आहेत. असं म्हणतात की रांगोळीतील रंग आणि आकार हे मनाला सकारात्मक बनवण्यात मदत करतात. त्यामुळे तुमची अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही वरील व्हिडीओजचा वापर करू शकता. आणि हो तुमच्या या हटके आमच्यासोबत शेअर करायाला विसरू नका