Diwali Padwa 2022 Messages: दिवाळीच्या पाडव्यानिमित्त खास Image, Wishes, Greetings पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी जमिनीचे, घराचे व्यवहार केले जातात, सोने किंवा इतर कुठल्या मोठ्या गोष्टीची खरेदी केली जाते.
दिवाळी उत्सवामध्ये साजऱ्या होणाऱ्या पाचही दिवसांचे विशेष महत्व आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा (Balipratipada) सण साजरा केला जातो. या दिवसाला दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2022) असेही म्हणतात. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो, त्यामुळे हा दिवसाचे महत्व अजून वाढते. बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात. या दिवशी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. तसेच ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते.
मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णू यांनी वामन बटूचे रूप घेऊन बळीराजाला पाताळात गाडले. परंतु हा जनतेची काळजी घेणारा राजा असल्याने अजूनही ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, अशी म्हण रूढ आहे. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला सुगंधी तेल-उटणे लावते, त्याला अभ्यंगस्नान घालून त्याचे औक्षण करते. त्यानंतर पती पत्नीला काही ओवाळणी देतो.
तर या खास दिवशी मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: आनंदाने साजरा करा बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा सण, भाऊबीजेला बहिणीला द्या काही हटके गिफ्ट)
दरम्यान, दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी जमिनीचे, घराचे व्यवहार केले जातात, सोने किंवा इतर कुठल्या मोठ्या गोष्टीची खरेदी केली जाते. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून एकमेकांच्या घरी फराळाला जातात. अनेक ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजाही केली जाते.