Diwali Padwa 2020 Wishes in Marathi: दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, GIF's शेअर करुन पती-पत्नीच्या नात्याचा दिवस करा खास!

दिवाळीत सगळीकडे आनंदी आनंद असतोच. त्यात पडते ती ती या दांपत्याच्या सहजीवनातील गोडवा वाढवणाऱ्या सणाची. दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो.

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

Diwali Padwa 2020 Wishes in Marathi: दिवाळीतील पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा एक गोड सण. दिवाळीत सगळीकडे आनंदी आनंद असतोच. त्यात पडते ती ती या दांपत्याच्या सहजीवनातील गोडवा वाढवणाऱ्या सणाची. दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो. यंदा 16 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आहे. या निमित्ताने स्त्रीया आपल्या पतीला ओवाळाल. परंतु, एखादा छानसा मेसेज पाठवून तुम्ही पतीराजांचा दिवस अगदी खास करु शकता. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) यावरुन मेसेज शेअर करुन तुम्ही सणाचा आनंद वाढवू शकता.

कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा.  दिवाळी पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांचे नवे वर्ष सुरु होते. या दिवशी व्यापारी वहीपूजन करुन नवीन खातेवह्या सुरु करतात. तर बलिप्रतिपदेनिमित्त मातीचे किंवा शेणाचे पाच गोळे करतात. किंवा बळी राजाची प्रतिकात्मक मुर्ती तयार करतात आणि त्याचे पूजन करतात. (Diwali Padwa 2020 Messages in Marathi: दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन वाढवा नात्यातील गोडवा!)

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..

दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन

आला दिवाळी पाडवा

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने

उजळेल आपल्या आयुष्याची वाट!

दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,

पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!

उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा!

त्यात असु दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!

शुभ पाडवा!

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,

तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,

बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Wishes | File Image

via GIPHY

दिवाळीतील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आणि अर्थ आहे. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. वसुबारसपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. त्यानंतर पुढील 4-5 दिवस आनंदात भुरकन् निघून जातात. मग पुन्हा पुढील वर्षीच्या दिवाळीची आपण वाट पाहू लागतो. परंतु, येणारी प्रत्येक दिवाळी आपण आनंदी आणि खास नक्कीच करु शकतो.