Diwali 2021 Invitation Messages Formats in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा शेअर करत आप्तांना, मित्रांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस

दीपावली 2021 (Deepavali 2021) च्या निमित्ताने यंदा व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून तुम्ही आमंत्रण पाठवणार असाल तर या निमंत्रण किंवा आमंत्रण पत्रिका पाठवूनही फराळाचं आमंत्रण देऊ शकता.

Diwali 2021 | File Image

दिवाळीचा (Diwali) खरा उत्साह यंदा 4 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. 4 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) साजरं केले जाणार आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा (Diwali Padwa) आणि 6 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण आहे. ही सारी धामधूम विकेंडला आली असल्याने अनेकांचे फॅमिली सोबत आणि मित्र मंडळींसोबत असे वेगवेगळे प्लॅन्स तयार आहेत. दिवाळी म्हटली की एकमेकांची भेट, त्यांना सरप्राईज गिफ्ट्स, खेळ, धम्माल मस्ती आणि गेटटुगेदर असे सारेच प्रकार होतात पण यंदा कोरोनाचा धोका कमी असला तरीही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे दिवाळी निमित्त तुम्ही सार्‍यांनाच भेटू शकत नसला  तरीही व्हर्च्युअल मिटिंगद्वारा, झूम कॉल द्वारा नक्कीच काही क्षण एकत्र आनंंदामध्ये नक्कीच घालवू शकता. मग यंदा दिवाळी पार्टी (Diwali Party) तुम्ही होस्ट करत असाल तर तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट  करून घेण्यासाठी काही खास आमंत्रण पत्रिका बनवून निमंत्रण पाठवू शकता.

दीपावली 2021 (Deepavali 2021) च्या निमित्ताने यंदा व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून तुम्ही आमंत्रण पाठवणार असाल तर या निमंत्रण किंवा आमंत्रण पत्रिका पाठवूनही फराळाचं आमंत्रण देऊ शकता. नक्की वाचा: Happy Diwali 2021 Messages: दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करुन साजरा करा दीपोत्सव! 

दिवाळी 2021 आमंत्रण मेसेज फॉरमॅट   

नमुना 1:

शुभ दीपावली !

आपल्या नात्यातील गोडवा मिळून मिसळून साजरी करू दिवाळी फराळ, गप्पांंसह, भेटीगाठी आणि गेम्स खेळण्यासाठी भेटू दिवाळी पाडव्याच्या संध्याकाळी!

अहं प्रत्यक्ष नव्हे, ऑनलाईन

खालील लिंक वर नक्की जॉईन व्हा!

तारीख- 5 नोव्हेंबर 2021

वेळ- रात्री 8 वाजल्यापासून

लिंक-

नमुना 2:

फराळाची  चव चाखण्यासाठी, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करण्यासाठी

आमच्या आनंदात तुमच्या उपस्थितीने अजून भर  टाकण्यासाठी

यंदा 5 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7 पासून आपल्या कुटुंबासमवेत

आमच्या घरी नक्की या!

पत्ता:

नमुना 3:

दिवाळीचा दिवा वातावरण करतो मंगलमय

अन तुमच्या संगतीने आमचं आयुष्य होवो तेजोमय!

दीपावली निमित्त फराळाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या घरी नक्की या

आग्रहाचं निमंत्रण!

निमंंत्रक -

तारीख,वेळ -

पत्ता-

यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने दिवाळीचा सण थोड्या मोकळ्या वातावरणामध्ये साजरा केला जाणार आहे. मात्र सरकारने तिसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी काही कोविड नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन कायम ठेवलं आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करत असाल तर किंवा इतरांकडे फराळाला जाणार असाल तर काळजी नक्की घ्या.