Laxmi Pujan Aarti: लक्ष्मी पूजन वेळेस या मंगलमय आरतीने करा लक्ष्मी मातेला प्रसन्न!
मंगलमय वातावरण रहावं म्हणून घरात मंद आवाजात लक्ष्मीची आरती लावून सहाकुटुंब लक्ष्मी पुजन करू शकाल.
Diwali Laxmi Puja Aarti: भारतामध्ये मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali). यंदा दीपावलीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) हे दोन्ही सण साजरे होत आहेत. दरम्यान या दीपोत्सवाच्या (Deepotsav) आनंदात सहभागी होत संध्याकाळी आर्थिक सुबकता आणि भरभराटीसाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जाणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील लक्ष्मी पुजन करणार असाल तर जाणून घ्या दिवेलागणीच्या वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करू शकता. मंगलमय वातावरण रहावं म्हणून घरात मंद आवाजात लक्ष्मीची आरती लावून सहाकुटुंब लक्ष्मी पुजन करू शकाल. Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.
मुंबई शेअर बाजारामध्येही आज (14 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. घरच्या घरी आज संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकता. यामध्ये घरातील पैशांची, लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. Laxmi Pujan 2020 HD Images: लक्ष्मी पूजनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Messages, Greetings आणि शुभेच्छापत्र देऊन साजरा करा दीपावलीचा सण.
लक्ष्मीपूजन 2020
लक्ष्मी पूजन आरती
पुराण कथेनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी लक्ष्मीला वास्तव्य करणे आवडते. असे मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरातही लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी आज संध्याकाळी तुम्ही खास लक्ष्मी पुजन पूजा, आरती करू शकता.